पुणे - खेड तालुक्यात लग्नाच्या वरातीत दारू पिऊन भांडणे केल्याच्या वादातून कडधे येथे युवकाचा खून झाल्याचा प्रकार समोर आला होता. सहा युवकांनी मारहाण केल्यानंतर मयत युवकाला चासकमान डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकुन दिले होते. दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह सापडला आहे. शंकर शांताराम नाईकडे, (वय ४०, रा कडधे, ता खेड)असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
वासुदेव बोंबले, पवन बोंबले दोघेही रा वेताळे, ता खेड व स्वप्नील सावंत, निलेश नाईकडे, ऋषिकेश उर्फ लखन नाईकडे, विलास परसुडे सर्व रा कडधे, ता खेड यांच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कडधे गावात मंगळवारी (दि २४) रोजी एका लग्नाची वरात रात्री सुरू होती. त्यापूर्वी चास तेथील एका बार मध्ये वाद झाले होते.
भांडणे नको म्हणून त्याठीकाणी वाद मिटविला आणि हे सहा जण वरातीला निघून गेले. मात्र त्या ठिकाणी ही शंकर नाईकडे आला व त्याने काही युवकांकडे प्यायला दारूची मागणी केली. नंतर नाचणाऱ्या काही युवकांमध्ये घुसून धक्काबुक्की करू लागला. त्यावर बाचाबाची होऊन त्याला मारामारीत रूपांतर झाले.
शंकर याला युवकांनी एकत्रितपणे त्याला बाजूला नेले. अंधारात त्याच्यावर चहुबाजूंनी जोरदार हल्ला चढवला. दगड, विटांनी डोक्यावर मारहाण केली. त्यात तो निपचित पडला. भविष्यात त्रास होऊ शकतो म्हणून त्याला एका वाहनात घालुन गावाच्या बाहेरून वाहणाऱ्या चास कमान च्या डाव्या कालव्याच्या पाण्यात फेकुन दिले. अखेर दोन दिवसांनंतर त्याचा मृतदेह कालव्यात आढळून आला आहे.
हेही वाचा - Video : दोन हत्तींमध्ये जोरदार संघर्ष.. एकाच दात तुटला.. पहा व्हिडीओ