ETV Bharat / state

पुणे-बंगळुरू महामार्गावरील मुळा नदीवरील पुलाला भेगा; वाहतूक बंद - मुळा नदीवरील पूल

हिंजवडीमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करून पूल बांधण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यावरून मुंबई तसेच हिंजवडीकडे वाहतूक होत होती.

पुणे-बंगळूरू महामार्गावरील मुळा नदीवरील पुलाला भेगा; वाहतूक बंद
author img

By

Published : Aug 5, 2019, 7:53 AM IST

पुणे - पुणे-बंगळुरू महामार्गावरील मुळा नदीवर बांधलेल्या पुलाला मधोमध भेगा पडल्या आहेत. तसेच सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा नदीला पूर आला आहे. त्यामुळे हा पूल वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुणे-बंगळूरू महामार्गावरील मुळा नदीवरील पुलाला भेगा; वाहतूक बंद

हिंजवडीमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यावरून मुंबई तसेच हिंजवडीकडे वाहतूक होत होती. अनेक अभियंते याच पुलाचा वापर करून हिंजवडीकडे जात असतात. त्यापैकीच काही अभियंत्यांनी रविवारी दुपारी पुलाला भेगा पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, पोलिसांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर काही तासातच हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

पुलाच्या मध्यभागी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच प्रवासी आणि अभियंत्यांच्या जिवाशी खेळण्यास ठेकेदाराला कोणी परवानगी दिली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता ठेकेदारावर कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Intro:mh_pun_06_damage_dridge_av_mhc10002Body:mh_pun_06_damage_dridge_av_mhc10002

Anchor:- हिंजवडीमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे-बेंगलोर महामार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करून पूल बांधण्यात आला आहे. परंतु, तो काही दिवसातच खचला असल्याचे समोर येत आहे. पुलाला मधोमध भेगा पडल्यात. हा पुल मुळा नदीवर उभारण्यात आला आहे. सतत सुरू असलेल्या पाऊसामुळे मुळा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्यातच हा पूल वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यावरून मुंबईकडे आणि हिंजवडीकडे वाहतूक होत होती. अनेक संगणक अभियंते हे या पुलाचा वापर करून हिंजवडीच्या दिशेने जातात. रविवारी दुपारी काही तरुणांनी ही बाब पोलीसांच्या लक्ष्यात आणून दिली, मात्र त्याला काही गांभीर्याने घेतले नाही. मात्र काही तासांनी तेथील वाहतूक बंद करत पुल खचला असल्याचे समोर आले. मधोमध भेग पडली असून संबंधित ठेकेदाराची चौकशी केली जावी अशी चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्यान, प्रवाशी आणि आयटी अभियंत्यांच्या जीवाशी खेळण्यास या ठेकेदाराला परवानगी दिली कोणी असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई होनार का हे पाहावे लागणार आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.