ETV Bharat / state

MSEB Remove Illegal Connection : बारामतीत आकडे बहाद्दरांविरोधात महावितरणची धडक मोहीम; अनधिकृत जोडण्या हटवल्या

author img

By

Published : Apr 21, 2022, 9:16 PM IST

महावितरणला खुल्या बाजारातून वीज घेण्याची वेळ आली आहे. त्यातच काही आकडे बहाद्दर विजेची चोरी करतात. त्यांच्यावर आता महावितरणने कारवाई सुरु केली ( MSEB Remove Illegal Connection ) आहे. बारामतीत शेकडो आकडे काढून कारवाई करण्यात आली.

MSEB Remove Illegal Connection
MSEB Remove Illegal Connection

बारामती - वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी व भारनियमन टाळण्यासाठी महावितरणवर खुल्या बाजारातून महागडी वीज घेण्याची वेळ आली आहे. तर, दुसरीकडे अनेक आकडे बहाद्दर बिनदिक्कतपणे विजेची चोरी करतात. त्यांच्या वाढीव भारामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाणही वाढत आहे. परिणामी, या आकडे बहाद्दरांना अद्दल घडविण्यासाठी बारामती परिमंडलाने धडक मोहीम हाती घेतली आहे. एका दिवसांत हजारो आकडे काढून त्यांच्या केबल व मोटारी जप्त करण्याचे काम केले आहे. या प्रयत्नांमुळे यंत्रणेवरील ताण कमी होऊन आर्थिक भार हलका होण्यास मदत होणार आहे. तसेच, ही धडक मोहीम अशीच सुरु राहणार ( MSEB Remove Illegal Connection ) आहे.

तर त्याचा बोजा ग्राहकांवर - तापमानात जशी वाढ होईल तशी राज्याची विजेची मागणी वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यापासून महावितरणची मागणी २४५०० मेगावॅटच्या पुढे गेली आहे. तसेच, ही मागणी टिकून आहे. उलट यात वाढच होत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही महाराष्ट्र शासन व महावितरण कसोशीने प्रयत्न करत आहे. पण, ही परिस्थिती सबंध देशात असल्याने वीज मिळणेही अवघड झाले आहे. खुल्या बाजारात विजेचे दर १२ रुपयांपर्यंत आहेत. ही महागडी वीज घ्यायची तर त्याचा बोजा पुन्हा ग्राहकांवर येणार. ती कमीत कमी घेता यावी याकरिता यंत्रणेवरील अनाधिकृत भार कमी करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.

महावितरणची धडक मोहीम - आकडे बहाद्दरांवर कारवाई करताना ज्या ११ केव्ही वाहिन्यांचा करंट १०० अॅम्पीअरच्या पुढे आहे, अशा 390 वाहिन्या बारामती परिमंडलात आहेत. त्यांना टार्गेट करुन गुरुवारी धडक मोहिम हाती घेतील आहे. यामध्ये अनाधिकृतपणे जोडलेले कृषीपंप, त्याचे केबल, स्टार्टर आदी जप्त करण्यात येत आहे. घरगुती व इतर ग्राहकांचे आकडे सुद्धा काढले जात आहेत. मोहिमेपूर्वी व नंतर किती भार कमी झाला याचा लेखाजोखा कर्मचाऱ्यांना विचारला जाणार आहे. या कामात वरिष्ठ अभियंत्यापासून जनमित्र, ऑपरेटर, कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तरच ताण होणार कमी - बारामती परिमंडलात एकूण १३ विभाग आहेत. या प्रत्येक विभागातून किमान २००० ग्राहकांवर जरी कारवाई अपेक्षित धरली तरी किमान २६००० अनाधिकृत पंप हटवले जातील. त्यातून प्रतिपंप ५ अश्वशक्तीचा जरी गृहीत धरला तरी किमान १५० मेगावॅटपेक्षा जास्तीचा ताण कमी होणार आहे. महावितरणच्या केडगाव (दौंड) विभागात बागायती क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे यंत्रणा अतिभारीत झाली आहे. कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांच्या टीमने आठ दिवसांपासून आकडे काढण्यास सुरुवात केली होती. आठ दिवसांत त्यांनी १५९१ अनाधिकृत शेतीपंपाचे आकडे केबलसकट काढून साहित्य उपकेंद्रात जमा केले होते. आता फिडरनिहाय कारवाईतही केडगावने आघाडी घेतली आहे.

हेही वाचा - Devendra Fadnavis : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यावर फडणवीसांना संशय म्हणाले, 'वसुलीचा..'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.