ETV Bharat / state

MPSC Exam: पोलीस उपनिरीक्षक पदाच्या निकालामध्ये मराठा उमेदवारांवर अन्याय, 65 जणांकडून आमरण उपोषणाचा इशारा - महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा २०२० पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. 650 पदांसाठीचा निकाल अपेक्षित असताना केवळ 585 पदांचा निकाल जाहीर करून उर्वरित 65 उमेदवारांचा निकाल घोषित करण्यात आला नाही. निकाल जाहीर न झालेले उमेदवार मराठा समाजाचे आहेत. आत्ता आम्ही करायचे काय? असा प्रश्न या उमेदवारांसमोर उपस्थित झाला आहे. आम्हाला तर आता मराठा आहोत, हे सांगण्याचीसुद्धा लाज वाटते, अशी भावना काही उमेदवारांनी बोलून दाखवली आहे.

MPSC Exam
पोलीस उपनिरीक्षक पद
author img

By

Published : Jul 11, 2023, 8:51 AM IST

Updated : Jul 11, 2023, 1:07 PM IST

मराठा उमेदवारांच्या प्रतिक्रिया

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परिक्षेत 65 मराठा उमेदवारांचा निकाल घोषित करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे याबाबत संयुक्त जाहिरात 2020 मधील सहाय्यक कक्ष अधिकारी आणि विक्रीकर निरीक्षक या पदांचा निकाल घोषित करण्यात आला. या सर्व उमेदवारांना नियुक्त्याही देण्यात आल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या मराठा उमेदवारांना मात्र डावलण्यात आले आहे. या जाहिरातीतील पदांचा निकाल गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रलंबित होता. आता त्यातल्या केवळ मराठा समाजातीतील 65 उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.

मराठा उमेदवारांचा निकाल राखीव : या जाहिरातीचा इतर कोणत्याही न्यायालयीन प्रकरणांशी प्रत्यक्ष संबंध नाही. इतर न्यायालयीन प्रकरणांशी संबंध जोडून शासनाने या उमेदवारांचा निकाल राखीव ठेवला आहे. मराठा समाजातील 65 उमेदवारांना डावलण्यात येऊन उर्वरित 585 उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्याचीही तयारी शासन करत आहे. त्यामुळे गुणवत्ता सिद्ध करूनही हे उमेदवार क्लेशदायक परिस्थितीत अडकले आहेत. या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत शासनाने याकडे तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी केली आहे.

आमरण उपोषण करण्याचा इशारा : या जाहिरातीमधल्या पदांच्या परीक्षांचा निकाल लागल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर जल्लोष होत आहे. दुसरीकडे मात्र केवळ मराठा उमेदवार आणि त्यांचे कुटुंबीय नैराश्येत आहेत. त्यांच्याकडून विविध माध्यमातून असंतोष व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाला शासनाचा मराठा समाजाकडे बघण्याचा कमकुवत दृष्टीकोन जबाबदार ठरत असल्याचा या उमेदवारांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. याआधीच्या कोणत्याही सरकारला मराठा आरक्षण देता आले नाही, आताही आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये केवळ मराठा समाजातील उमेदवारांना डावलण्यात येत आहे. न्याय मिळवण्यासाठी आमरण उपोषण करु, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

हेही वाचा :

  1. MPSC Hall Ticket Data Leak : एमपीएससी उमेदवारांचा हॉल तिकीट डेटा लिक, विद्यार्थ्यांची चौकशीची मागणी
  2. MPSC Final Result : MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, सांगलीचा प्रमोद चौगुले पहिला
  3. Agricultural Services Main Exam : कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारची पाठ; विद्यार्थ्यांचे 22 दिवसांपासून आंदोलन

Last Updated : Jul 11, 2023, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.