ETV Bharat / state

Udayanraje Bhosale Demand : नुपूर शर्मांप्रमाणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई व्हावी - खासदार उदयनराजे भोसले

author img

By

Published : Dec 13, 2022, 6:44 PM IST

नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्यावर भाजपने ज्याप्रमाणे कारवाई केली, त्याप्रमाणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) व सुधांशू त्रिवेदींच्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ( MP Udayan Raje Bhosale ) यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ( Chhatrapati Shivaji Maharaj ) अवहेलना केल्याच्या निषेधार्थ आज (13 डिसेंबर) पुण्यात सकाळी मुकमोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

Udayan Raje
Etv Bharat
छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना केल्याचा निषेधार्थ पुण्यात मुकमोर्चा

पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यबद्द्ल ( Chhatrapati Shivaji Maharaj ) अवमानकारक शब्द वापरून छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना केल्याचा निषेधार्थ आज मंगळवारी सकाळी निघालेल्या मुकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तब्बल 1 लाखाहून अधिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

राज्यपालांवर कारवाईची मागणी: छत्रपति शिवाजी महाराज हे आजही आदर्श पुरुष आहेत. साडेतीनशे वर्षांपासून या आदरामधे वाढ होत आहे. आज त्यांना आदर्श म्हणा अस सांगायची अशी वेळ आली आहे हे दुर्दैव आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर नुपूर शर्मावर जशी डिसीप्लीनरी एक्शन झाली तशी कारवाई व्हायला हवी, अशी मागणी यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

पुण्यात मोकमोर्चा: खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मूक मोर्चा ला सुरवात झाली. यावेळी डेक्कन जिमखाना, टिळक चौक मार्गे लक्ष्मी रस्त्याने शगुण चौक,नगरकर तालिम चौक, बेलबाग चौक मार्गे लालमहालजवळ आली. महालासमोरील जिजामाता चौकात मुकमोर्चाची सांगता झाली आणि यावेळी सभा झाली. मोर्चामध्ये खासदार उदयनराजे हे सहभागी झाले होते. पण त्यांनी लाल महाल येथे दर्शन घेत ते निघून गेल्याने चर्चेला उधाण आले आहे.

मुकमोर्चात सहभागी नेते: खासदार छत्रपती उदयनराजे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, दीपक मानकर, अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, मोहन जोशी, आमदार सुनिल टिंगरे, माजी आमदार दिप्ती चवधरी, संगीत तिवारी, अंकुश काकडे,रुपाली पाटील, अजित दरेकर, संजय बालगुडे, संतोष शिंदे, राजेंद्र कुंजिर, विकास पासलकर चंद्रकांत मोकाट आदी या मुकमोर्चात सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.