बारामती - मतदारसंघातील मुळशी आणि वेल्हे तालुक्याच्या दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत वीज पोहोचविण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (गुरुवार) राज्य सरकारकडे १२ कोटी रुपयांची मागणी केली. बारामती लोकसभा मतदारसंघातील उर्जा विभागाच्या विविध प्रश्नांविषयी राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या दालनामध्ये बैठक झाली. या बैठकीत मुळशी व वेल्हे या तालुक्यातील वाड्या-वस्त्यांसाठी १२ कोटी रुपयांच्या निधीची आग्रही मागणी सुळे यांनी केली.
२२ ठिकाणी नवीन सब स्टेशन उभारण्याची केली मागणी -
यासोबतच रहाटणी ते वरसगाव सब स्टेशनला आणखी एक विद्युत वाहिनी द्यावी तसेच भाटघर येथील १३२ केव्ही सब स्टेशनच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा. असेही त्या म्हणाल्या. पुरंदर आणि बारामती तालुक्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला तात्काळ मंजुरी मिळावी, हा मुद्दा देखील या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. बारामती, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, इंदापूर, हवेली हे तालुके आणि खडकवासला विधानसभा मतदार संघात एकूण २२ ठिकाणी नवीन सब स्टेशन उभारणीसाठी मंजुरी मिळावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. यावेळी उर्जा विभागाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल व बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रवीण शिंदे उपस्थित होते.
याठिकाणी नवीन सब स्टेशन उभारण्याची मागणी केली आहे -
बारामती तालुका सबस्टेशन -
मूढाळे - २२० केव्ही
करंजे - ३३x११ केव्ही
कऱ्हावागज- ३३x११ केव्ही
अंजनगाव- ३३x११ केव्ही
सुपा- ३३x११ केव्ही
इंदापूर तालुका सबस्टेशन -
झगडेवाडी- ३३x११ केव्ही
निरगुडे- ३३x११ केव्ही
दौंड तालुका सबस्टेशन -
कानगाव- ३३x२२ केव्ही
राजेगाव- ३३x११ केव्ही
रोटी- ३३x११ केव्ही
हवेली तालुका सबस्टेशन -
वारजे- २२x११ केव्ही
वडकी- ३३x२२ केव्ही
पुरंदर तालुका सबस्टेशन -
बेलसर- ३३x११ केव्ही
वीर- ३३x११ केव्ही
दिवे- ३३x२२ केव्ही
वेल्हे तालुका सबस्टेशन -
पासनी- ३३x११ केव्ही
मार्गासनी- ३३x११ केव्ही
भोर तालुका सबस्टेशन -
कमथडी (मोहरी)- ३३x११ केव्ही
वेळू- ३३x२२ केव्ही
न्हावी- ३३x२२ केव्ही
भोर- ३३x२२ केव्ही
मुळशी तालुका सबस्टेशन -
कुंभेरी- ३३x२२ केव्ही
हेही वाचा -मुकेश अंबानी यांनी 'इतके' घेतले वेतन; वाचून बसेल धक्का