ETV Bharat / state

Supriya Sule critics : हे तर भाजपचे कट-कारस्थान, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या संभाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावर (Ajit Pawar Sambhaji Maharaj Statement) प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा त्यांच्या विचारांचे लोक बोलतात तेव्हा पाठराखण करण्याचे पाप भाजप करते. स्वतःच्या चुका, अपयश झाकण्यासाठी ते अजित पवार यांच्याविरोधात कट, कारस्थान करत आहेत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule critics on BJP) यांनी केली.

Supriya Sule critics
खासदार सुप्रिया सुळे
author img

By

Published : Jan 3, 2023, 10:51 PM IST

बारामती (पुणे) : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याविषयीच्या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar Sambhaji Maharaj Statement) यांच्याविरोधात राज्यभर आंदोलने सुरु आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याविरोधात सत्तेतील लोक रस्त्यावर उतरले आहेत. जेव्हा त्यांच्या विचारांचे लोक बोलतात तेव्हा पाठराखण करण्याचे पाप भाजप करते. स्वतःच्या चुका, अपयश झाकण्यासाठी ते अजित पवार यांच्या विरोधात कट, कारस्थान करत आहेत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule critics ) यांनी केली. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

पाठ राखण करण्याचे पाप भाजपचे : खासदार सुळे (MP Supriya Sule) म्हणाल्या की, इतिहासासंबंधी जर कोणाचे काही वेगळे मत असेल तर राज्यात अनेक इतिहासकार आहेत. आपण त्यांचे एक चांगले चर्चासत्र आयोजित करू शकतो. राज्यात जेव्हा त्यांच्या विचारांचे लोक काहीही बोलतात, तेव्हा त्यांची पाठराखण करण्याचे पाप भाजप करते. इतिहास खूप महत्त्वाचा आहे. सत्तेतील लोकांकडे बोलण्यासारखे काही नाही. स्वतःच्या चुका, अपयश झाकण्यासाठी ते अजित पवार यांच्या विरोधात कट-कारस्थान करत आहेत.

सुषमा स्वराज यांच्या वक्तव्याचा संदर्भ : त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीही नाही. देशाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे माझ्यासह विरोधी पक्षातील लोक सातत्याने सांगत आहेत. जगाच्या रिपोर्टमध्येही तशी नोंद झाली आहे. यामुळे भविष्यात निर्यातीला अडचण येईल. यानिमित्ताने मला सुषमा स्वराज यांच्या, जब रुपया गिरता है तब देश की प्रतिष्ठा गिरती है, हे शब्द आठवत असल्याचे त्या म्हणाल्या. रुपयासमोर डाॅलर अधिक ताकदवान होतेय यामुळे क्रूड आॅईल व अन्य बाबींच्या आयातीवरही मोठा परिणाम होईल. आजच इंधनाची भाववाढ केंद्र आणि राज्याने केली आहे. त्यामुळे अतिशय अडचणीच्या काळातून राज्य व देश चालले आहे. आम्ही विरोधी पक्षात असलो तरी या प्रश्नी आवश्यक ते सहकार्य करू. जगातील मोठ्या अर्थतज्ज्ञांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा समावेश होतो. त्यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन घेतले तर देश या स्थितीतून तरेल असे त्या म्हणाल्या.

अजित पवारांच्या विधानावरून वाद : अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते, असं रोखठोक वक्तव्य केलं. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटानं तात्काळ आक्षेप घेतला. तर राज्यभर आंदोलनंही सुरु झाली आहेत. दरम्यान, त्यांनी माफी मागवी अशी मागणी केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.