ETV Bharat / state

Supriya Sule Criticized PM Modi  : 'सरपंच ते पंतप्रधान त्यांना मोदीजींशिवाय पर्यायच नाही'- सुप्रिया सुळे - Supriya Sule Criticized PM Modi in Pune

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान हे जर राज्यात आणि मुंबईत येत असतील तर आम्ही मनापासून त्यांचे स्वागत करू. पण, एक गोष्ट आहे सरपंच ते पंतप्रधान त्यांना मोदींशिवाय पर्यायच नाही. भाजप खूप मोठा पक्ष आणि खूप मोठ्या नेत्यांची फळी असताना देखील मोदीजीं शिवाय पर्याय नसल्याचे यावेळी सुळे यांनी सांगितले.

Supriya Sule Criticized PM Modi in Pune
सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेत बोलताना
author img

By

Published : Jan 19, 2023, 5:26 PM IST

सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेत बोलताना

पुणे : पुणे महापालिका आयुक्त यांच्याशी मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. सत्तेचे विकेंद्रीकरण आणि पंचायत राज हे यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू आहे. यात प्रत्येक गोष्टीत कामाचे विभाजन हे झालेले होते. पण, गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका या घेण्यात याव्या, अशी आम्ही मागणी करत आहोत. पण, ते त्यांच्या स्वार्थासाठी निवडणूक घेत नाही. सर्वसामान्य नागरिकांची कामे होत नाही आणि यात सर्वसामान्य माणूस हा भरडला जात असल्याची टीका यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली.

सुळेंचे ताशेरे : कालच कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यावर सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारमधील नेते मंडळी बसून यावर निर्णय घेतील. कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे आज बारामती दौऱ्यावर त्या म्हणाल्या की, बारामतीत जे कोणी येतात त्यांचे स्वागतच होणार आहे. देशात मागच्या तीन वर्षांत सर्वाधिक स्टार्टअप हे महाराष्ट्रात झाले आहे. यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक स्टार्टअप झाले आहेत आणि हा केंद्र सरकारचा डाटा आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की, पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. कोयता गँग हे काय प्रकरण आहे हे देखील आता समोर आहे. तसेच चाकणमधून कुठलंही प्रोजेक्ट हे बाहेर जाणार नाही. आनंद महिंद्रा यांच्याशी मी बोलले होते त्यांनी कन्फर्म केले आहे की, महिंद्रा चाकणमध्ये एक्सपेनशन करत आहे आणि हे ऑन रेकॉर्ड आहे, असे देखील यावेळी सुळे म्हणाले.

'जी २०' चा पुण्याला फायदा काय ? शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि त्यांच्या हयातीत उद्धव ठाकरे हे उत्तराधिकारी १० वर्ष होते. तुम्हाला वेगळा विचार असेल तर वेगळा पर्याय शोधा, पण असे करू नये. माझ्यासाठी उद्धव ठाकरे हेच शिवसेना अध्यक्ष आहेत. 'जी २०' कशासाठी होती हे मला माहीत नाही. ही परिषद पुण्यात झाली त्यात काय चर्चा झाली, पुण्याला याचा फायदा काय झाला याबाबत मला माहिती नाही, असे देखील यावेळी सुळे म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांना टोला : महाराष्ट्र मंत्री मंडळ विस्तार बाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रात मंत्रालयात फार से मंत्री दिसत नाही. नक्की कुठल्या मंत्र्याकडे कुठले पद आहे हे कळतच नाही. ६ महिने झाले यांचे सरकार आले आहे आणि हे अयशस्वी आहे. सगळ्यांची कामे थांबली आहेत. गटारी तुंबले, पाणी नाही, पुलांची कामे हे सगळे थांबले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दावोसला जाण्याची गरज नाही. त्यांच्या बरोबर हैदराबादचे काही लोक होते. मुंबईत करार झाले असते ते लोकं हैदराबादवरुन मुंबईत आले असते. कुठले गुंतवणूकदार होते तिथे ते काही कळले नाही.असा टोला यावेळी सुळे यांनी लगावला.

हेही वाचा : Bageshwar Dham Sarkar : नागपूर प्रकरणावरून पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे वक्तव्य, आमची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.