ETV Bharat / state

...त्यामुळे गौतम बुद्ध जेवढे महत्वाचे तेवढेच छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज - खासदार संभाजीराजे - छत्रपती शिवाजी महाराज

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी रविवारी सांगली येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. मोदींनी संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यक्रमात बोलताना 'युद्ध नव्हे तर जगाला बुद्धाची गरज आहे' असे उद्गार केले होते.

संभाजीराजे छत्रपती
author img

By

Published : Sep 29, 2019, 7:30 PM IST

Updated : Sep 29, 2019, 9:35 PM IST

पुणे - कायम वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले संभाजी भिडे यांनी रविवारी सांगलीमध्ये गौतम बुद्धांवर अशाच प्रकारे वादग्रस्त विधान केले. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रत्युत्तर दिले. बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, जगाचा संसार चालवण्यासाठी गौतम बुद्ध जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच महत्वाचे छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज आहेत. बुद्ध अध्यात्म, तर शिवाजी महाराज शौर्याचे सर्वोच्च बिंदू असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत आपले मत व्यक्त केले.

खासदार संभाजीराजे छत्रपती

हेही वाचा - पंतप्रधान चुकीचं बोलले.. भारताने जगाला बुद्ध दिला पण उपयोगाचा नाही - संभाजी भिडे

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी रविवारी सांगली येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. मोदींनी संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यक्रमात बोलताना 'युद्ध नव्हे तर जगाला बुद्धाची गरज आहे' असे उद्गार केले होते.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, कोण काय बोलले यात मला जायचे नाही. त्यापेक्षा माझे मत वेगळे आहे. अध्यात्माचे सर्वोच्च बिंदू गौतम बुद्ध आहेत, तर शौर्याचे सर्वोच्च बिंदू छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत, असे मला वाटते. त्यामुळे गौतम बुद्ध जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच महत्वाचे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत.

उदयनराजेंना माझं नेहमीचं समर्थन - संभाजीराजे छत्रपती

उदयनराजेंच्या प्रचारासाठी तुम्ही जाणार का? असे संभाजीराजेंना विचारले असता ते म्हणाले, मी आजपर्यंत कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर गेलो नाही याचा अर्थ माझा एखाद्याला विरोध आहे असे होत नाही. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे हे कोणत्याही पक्षात असले तरी माझा त्यांना संपुर्ण पाठींबा आहे.

हेही वाचा - 'शरद पवारांना शिवाजी महाराजांच्या नखांची तर सर आहे का'

Intro:जगाचा संसार चालविण्यासाठी गौतम बुद्ध जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच महत्वाचे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असल्याचे मत छत्रपती संभाजी महाराज यांनी व्यक्त केले..पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला..शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी आज सांगलीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेतील वक्तव्यावर आक्षेप घेतला होता..जगाचा संसार सुखाने चालण्यासाठी बुद्ध नव्हे तर संभाजी महाराज हवेत असे वक्तव्य केले होते..त्यावर विचारले असता छत्रपती संभाजी महाराज बोलत होते..Body:संभाजी महाराज म्हणाले, कोण काय बोलले यापेक्षा माझे मत वेगळे आहे. अध्यात्माचा सर्वोच्च बिंदू गौतम बुद्ध आहेत तर शौर्याचा सर्वोच्च बिंदू छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत..त्यामुळे गौतम बुद्ध जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच महत्वाचे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत.Conclusion:उदयनराजेंना माझा नेहमीच सपोर्ट
उदयनराजेंच्या प्रचारासाठी तुम्ही जाणार का, असे विचारले असता छत्रपती संभाजी महाराज म्हणाले, मी आजपर्यंत कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर गेलो नाही याचा अर्थ माझा एखाद्याला विरोध आहे असं होतं नाही..उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे हे कोणत्याही पक्षात आले तरी माझा त्यांना फुल सपोर्ट आहे..
Last Updated : Sep 29, 2019, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.