ETV Bharat / state

'सारथी' ला वाचविण्यासाठी खासदार संभाजीराजेंचे लाक्षणिक उपोषण - MP sambhaji raje protest pune

मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी युती सरकारच्या काळात सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली होती. मात्र, अवघ्या काही महिन्याच्या कालावधीतच या संस्थेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. या संस्थेची स्वायत्तता रद्द करण्याचा डाव असल्याचे आरोप मराठा संघटनांनी केले आहेत.

pune
'सारथी' ला वाचविण्यासाठी खासदार संभाजीराजेंचे लाक्षणिक उपोषण
author img

By

Published : Jan 11, 2020, 2:04 PM IST

पुणे - मराठा समाजाच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या बचावासाठी खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी पुण्यातील सारथी संस्थेबाहेर लाक्षणिक उपोषण सुरू केले. छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच अशाप्रकारे उपोषणाला बसली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

'सारथी' ला वाचविण्यासाठी खासदार संभाजीराजेंचे लाक्षणिक उपोषण

हेही वाचा - 'सारथी' बचावसाठी मराठा समाज संघटना आक्रमक, पुण्यात लाक्षणिक उपोषण

मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी युती सरकारच्या काळात सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली होती. मात्र, अवघ्या काही महिन्याच्या कालावधीतच या संस्थेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. या संस्थेची स्वायत्तता रद्द करण्याचा डाव असल्याचे आरोप मराठा संघटनांनी केले आहेत.

हेही वाचा - राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या शतकपूर्ती निमित्त पंडित घोष यांच्या बासऱ्यांचा संग्रह प्रदान

संस्थेचा कारभार अत्यंत व्यवस्थित पद्धतीने सुरू असताना देखील हे सगळे का घडते? याबाबत मराठा समाज संतप्त आहे. मुख्य सचिव जे. पी. गुप्ता यांच्या माध्यमातून संस्थेला नख लावण्याचे काम केले जात असून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. याचा निषेध म्हणून शनिवारी पुण्यात लाक्षणिक उपोषण करण्यात येते आहे.

हेही वाचा - आलिशान मोटारीतून भाजी विक्रीचा व्यवसाय!

संभाजीराजे यांनी सारथी संस्थेची स्वायत्तता काढू नये, संस्थेला बळ द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे देखील केली होती. मात्र, अद्याप यासंदर्भात कुठलीही हालचाल होत नसल्याने संभाजीराजे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी संस्थेच्या बाहेर स्वतः संभाजी राजे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत मराठा समाजातील युवक युवती कार्यकर्ते उपोषणाला बसले असून दिवसभर हे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.

Intro:मराठा समाजाच्या सारथी संस्थेला वाचनवण्यासाठी खासदार संभाजीराजे रस्त्यावर, लाक्षणिक उपोषण सुरूBody:mh_pun_02_sambhaji_raje_sarthi_uposhan_av_7201348

Anchor
खासदार संभाजी राजे यांनी मराठा समाजाच्या उन्नतीसाठी निर्माण करण्यात आलेल्या सारथी संस्थे च्या बचावासाठी पुण्यातील सारथी संस्थे बाहेर उपोषण सुरू केल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच अशाप्रकारे उपोषणाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी युती सरकारच्या काळात सारथी संस्थे ची स्थापना करण्यात आली होती मात्र अवघ्या काही महिन्यात या कालावधीत च या संस्थेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे या संस्थेची स्वायत्तता रद्द करण्याचा डाव टाकला गेला असल्याचे आरोप मराठा संघटनांनी कडून केले गेले आहेत संस्थेचा कारभार अत्यंत व्यवस्थित पद्धतीने सुरू असताना देखील हे सगळं का घडते याबाबत मराठा समाज संतप्त आहे मुख्य सचिव जे पी गुप्ता यांच्या माध्यमातून संस्थेला नख लावण्याचे काम केले जात असून त्यांना निलंबित करावे अशी मागणी मराठा समाजाने केली आहे आणि त्यासाठी शनिवारी पुण्यात लाक्षणिक उपोषण करण्यात येते आहे युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी सारथी संस्थेची स्वायत्तता काढू नये संस्थेला बळ द्यावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे देखील केली होती मात्र अद्याप या संदर्भात कुठलीही हालचाल होत नसल्याने संभाजीराजे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता आणि त्यानुसार शनिवारी संस्थेच्या बाहेर स्वतः खासदार संभाजी राजे उपोषणाला बसले आहेत त्यांच्यासोबत मराठा समाजातील युवक युवती कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत दिवसभर लाक्षणिक उपोषण केले जाणार आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.