ETV Bharat / state

Amol Kolhe : राष्ट्रवादीच्या आत्मक्लेश आंदोलनाच्या अनुपस्थितीवर खासदार कोल्हेंचे मोठे विधान

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल राज्यपालांवर कारवाई होण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( MP Amol Kolhe ) अनुपस्थित होते. यावर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. शिवसिंहाच्या छाव्याने ‘आत्मक्लेश’ वगैरे बाबींपेक्षा झेपावण्याला आणि ठसा उमटवण्यालाच महत्व दिले असते. कदाचित छत्रपतींच्या अवमानाने आत्मक्लेश करायचा नसतो तर फाडून खायचे असते. त्याच आदर्शावर चालण्याचा माझा प्रयत्न आहे, असे मत यावेळी अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 4, 2022, 8:24 PM IST

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( NCP MLA Rohit Pawar ) यांच्या नेतृत्वाखाली काल वढू-तुळापूर येथे करण्यात आलेल्या आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( MP Amol Kolhe ) हे अनुपस्थित असल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले होते. यावर खासदार अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.

खासदार कोल्हेंची भूमिका: ते म्हणाले की, मला पूर्वकल्पना नसल्यामुळे मी उपस्थित नव्हतो. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचावा म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या “शिवपुत्र संभाजी” महानाट्यासंदर्भात संभाजीनगर येथे उपस्थित होतो. शिरूर मतदारसंघातील “आत्मक्लेश” साठी अनुपस्थित असल्याने उगाच चर्चा करण्याची गरज नाही. कारण शिवसिंहाच्या छाव्याने ‘आत्मक्लेश’ वगैरे बाबींपेक्षा झेपावण्याला आणि ठसा उमटवण्यालाच महत्व दिले असते. कदाचित छत्रपतींच्या अवमानाने आत्मक्लेश करायचा नसतो तर फाडून खायचे असते. त्याच आदर्शावर चालण्याचा माझा प्रयत्न आहे, असे मत यावेळी अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.

आत्मक्लेश आंदोलन: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले. तसेच भाजपचे नेते देखील अधून मधून विवादपूर्ण विधान करत असल्याने राज्यपाल यांच्यावर कारवाई करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी आत्मक्लेश आंदोलन केले. वढूबुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा समाधी स्थळी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.