ETV Bharat / state

'आमदार थोपटेंसाठी भाजपची दारे उघडी' - खासदार गिरीश बापट

आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रीपदापासून डावलण्यात आले आहे. जर थोपटेंना काँग्रेसची तत्व पटत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. भाजपकडून निवडूक लढवावी आम्ही त्यांना निवडूण आणू, असे खासदार गिरीश बापट म्हणाले.

खासदार गिरीश बापट
खासदार गिरीश बापट
author img

By

Published : Jan 1, 2020, 8:53 AM IST

Updated : Jan 1, 2020, 9:49 AM IST

पुणे - आमदार संग्राम थोपटे यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांना एखाद्या खात्याची जबाबदारी द्यायला हवी होती. पण, त्यांना मंत्रीपदापासून डावलण्यात आले. त्यांना जर काँग्रेसचे विचार पटत नसतील तर त्यांच्यासाठी भाजपची दारे उघडी आहेत, असे खासदार गिरीश बापट म्हणाले.

बोलताना खासदार गिरीश बापट

मंगळवारी (दि. 31 डिसें) आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत पुणे येथील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर खासदार बापट प्रतिक्रिया देत होते.

हेही वाचा - ज्यांनी काँग्रेस भवनाची तोडफोड केली, त्यांना त्याची किंमत मोजावीच लागेल - रमेश बागवे

पुढे ते म्हणाले, अनंतराव थोपटे हे त्यांच्या पक्षाशी अत्यंत एकनिष्ट आहेत. त्यांना पाडण्याचा प्रयोग त्यांच्याच पक्षातील काहींनी केला होता. आता संग्राम थोपटे यांसोबतही असेच होत आहे. जर थोपटेंना काँग्रेसचे विचार पटत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवावी त्यांना आम्ही निवडूण आणू, असेही खासदार गिरीश बापट म्हणाले.

हेही वाचा - कोरेगाव भीमा शौर्य दिन : विजयस्तंभाला विद्युत रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजीने अभिवादन

Intro:Pune:-
*खासदार गिरीश बापट*
( *काँग्रेस भवन तोडफोड* )
संग्राम थोपटेना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. पक्षांतर्गत कोणाला संधी द्यायची हा पक्षनेतृत्वाचा निर्णय असतो. पण अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्यामुळे मध्यंतरी राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या नेतृत्वाने ही त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता. हाच प्रयोग आता संग्राम थोपटे यांच्याबाबतीत होतोय.. पक्षातल्या चांगल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायलाच पाहिजे पण दंगा करणे , तोडफोड करणे हे योग्य नाही. त्या मार्गाने जाऊही नये असे मला वाटते. त्यांना काँग्रेसची तत्व पटत नाही तर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा द्यावा. आम्ही त्यांच्या मागे आहोत. भाजपची दारं त्यांना उघडी आहेत. ते जर भाजपमध्ये आले तर आम्ही त्यांना परत निवडून आणू..संग्राम थोपटे माझे मित्र आहेत.त्यांना मंत्रिपद दिले असते तर आम्हाला आनंद झाला असता. पण अन्याय करण्याची काँग्रेसची परंपरा आहे, त्यामुळे यात काही वेगळं घडलं असं मला वाटत नाही..Body:।।।Conclusion:।।।
Last Updated : Jan 1, 2020, 9:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.