ETV Bharat / state

पुणे विभागातील 5 लाख 82 हजार 683 रुग्ण झाले कोरोनामुक्त - कोल्हापूर जिल्हा बातमी

पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातून एकूण 5 लाख 82 हजार 683 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

विभागीय आयुक्त सौरभ राव
विभागीय आयुक्त सौरभ राव
author img

By

Published : Feb 24, 2021, 3:17 AM IST

पुणे - पुणे विभागातील 5 लाख 82 हजार 683 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 8 हजार 286 झाली आहे. तर सक्रिय रुग्ण संख्या 9 हजार 340 इतकी आहे. कोरोनामुळे एकूण 16 हजार 263 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.79 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्ह्याची स्थिती

पुणे जिल्ह्यात सध्या 7 हजार 299 सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 3 लाख 99 हजार 308 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 3 लाख 82 हजार 909 रुग्ण कोरोनामुक्त झाले व घरी गेले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 9 हजार 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.89 टक्के आहे.

सातारा जिल्हाची स्थिती

सातारा जिल्ह्यातील एकूण 57 हजार 932 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 55 हजार 142 रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात 948 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनामुळे एकूण 1 हजार 842 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यातील 52 हजार 456 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 49 हजार 816 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात 813 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनामुळे एकूण 1 हजार 827 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्ह्यातील 48 हजार 384 कोरोना रुग्णांपैकी 46 हजार 507 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. 120 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनामुळे 1 हजार 757 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 50 हजार 206 कोरोनाग्रस्तांपैकी 48 हजार 309 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 160 इतकी आहे. कोरोनामुळे एकूण 1 हजार 737 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

895 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ

पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येत 895 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 701, सातारा जिल्ह्यात 95, सोलापूर जिल्ह्यात 68, सांगली जिल्ह्यात 11 तर कोल्हापूर जिल्ह्यात 20 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

हेही वाचा - पीपीई किटमुळे होणारा त्रास कमी होणार; हवा खेळती ठेवणाऱ्या उपकरणाचे संशोधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.