ETV Bharat / state

दौंड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी 1 हजार 174 उमेदवार रिंगणात - Pune district news

दौंड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 1 हजार 174 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

दौंड तहसीलदार कार्यालय
दौंड तहसीलदार कार्यालय
author img

By

Published : Jan 5, 2021, 7:50 PM IST

दौंड (पुणे) - दौंड तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. निवडणुकीसाठी 49 गावांतून एकूण 2 हजार 41 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या मंगळवारी (दि. 4 जाने.) शेवटचा दिवशी 867 उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामुळे 49 ग्रामपंचायतींसाठी एकूण 1 हजार 174 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धावपळ

आपल्या पॅनलच्या उमेदवारांना अडचणीचे ठरतील, अशा उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पॅनल प्रमुखांना चांगलीच कसरत करावी लागण्याचे चित्र दौंड तालुक्यातील विविध गावात दिसून आले. दौंड तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पॅनल प्रमुख आणि इतर उमेदवारांची मोठी लगबग दिसून आली. आपल्या मर्जीतील किंवा आपल्या गटाचे पॅनेलने उमेदवारी दिलेले उमेदवार सोडून इतर उमेदवारांची मनधरणी पॅनेल प्रमुखांना करावी लागली असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.

867 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 49 गावांतील 867 उमेदवारांनी माघारी घेतले. यामुळे 49 ग्रामपंचायतींसाठी एकूण 1 हजार 174 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामुळे अनेक वार्डात एका-एका जागेसाठी मोठी चुरस पहायला मिळणार आहे.

चिन्ह वाटप झाले

अर्ज मागे घेण्याचा कालावधी संपल्यानंतर चिन्ह वाटप होणार असल्याने दौंड तहसीलदार कार्यालयात मोठ्या संख्येने उमेदवार हजर होते. पॅनेलनुसार व अपक्ष उमेदवारांना यावेळी चिन्ह वाटप करण्यात आले आहेत.

हेही वाचा - ईडी कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर अ‌ॅड. सरोदेंची नाराजी

हेही वाचा - पुणे मेट्रोमध्ये 'बायोडायजेस्टर'चा वापर; डीआरडीईबरोबर करार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.