ETV Bharat / state

पुणे विभागातील 10 हजार रुग्ण कोरोनामुक्त, मंगळवारी 330 नव्या रुग्णांची नोंद

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 63.90 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.51 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. यापैकी पुणे जिल्ह्यात 12 हजार 389 बाधीत रुग्ण असून 7 हजार 922 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यातील 3 हजार 952 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

corona patients in pune division
पुणे विभागातील 10 हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
author img

By

Published : Jun 16, 2020, 7:09 PM IST

पुणे - विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 हजार 893 झाली आहे. यातील 10 हजार 156 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, सध्या 5 हजार 21 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. विभागातील एकूण 716 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच 254 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 63.90 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.51 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. यापैकी पुणे जिल्ह्यात 12 हजार 389 बाधीत रुग्ण असून 7 हजार 922 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यातील 3 हजार 952 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर, एकूण 515 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 254 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 63.94 टक्के आहे. तर, मृत्यूचे प्रमाण 4.16 टक्के इतके आहे.

मंगळवारी पुणे विभागातील बाधितांच्या संख्येमध्ये एकूण 330 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 242, सातारा जिल्ह्यातील 7, सोलापूर जिल्ह्यातील 65, सांगली जिल्ह्यातील 11 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 5 जणांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यात 745 कोरोनाबाधित रुग्ण असून 537 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 174 आहे. तर, एकूण 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 787 कोरोनाबाधित रुग्ण असून 942 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 693 आहे. एकूण 152 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यात 247 रुग्ण असून 121 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 119 आहे. एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 725 रुग्ण असून 634 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 83 आहे. एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 1 लाख 21 हजार 4 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 1 लाख 17 हजार 379 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 625 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 1 हजार 228 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 15 हजार 893 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.