ETV Bharat / state

Israel Hamas War : 'शिवरायांच्या आरमार उभारणीत इस्रायलींचे सहकार्य' - इस्रायली नागरिकांविषयी मोहन शेट्टे

Mohan Shette On Israel People: जगभर तसेच प्रामुख्याने भारतात राहणाऱ्या इस्राईलच्या लोकांना 'बेने इस्रायली' म्हटलं जातं. (Bene Israel) आज मोठ्या प्रमाणावर भारतातील विविध शहरात 'बेने इस्रायली' (Jew) लोकं हे राहत असतात. पुण्यात देखील हे लोक राहत असून यांचा एक इतिहास आहे आणि नेमका तो इतिहास काय याबाबत इतिहास अभ्यासक मोहन शेट्टे (Historian Mohan Shette) यांनी माहिती दिली आहे. (Israel)

Mohan Shette On Israel People
इस्रायली लोकांना आश्रय
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 10:44 PM IST

Updated : Oct 17, 2023, 7:09 AM IST

इस्रायली नागरिकांचा इतिहास आणि योगदान सांगताना मोहन शेट्टे

पुणे Mohan Shette On Israel People: इतिहास अभ्यासक मोहन शेट्टे म्हणाले की इस्राईलची संस्कृती ही प्राचीन आहे. यांना 'ज्यू' तसेच 'यहुदी' देखील म्हटलं जातं. आज इस्राईल जिथं वसलेलं आहे त्याला 'पॅलेस्टाईन' असं म्हटलं जातं. तेथून त्यांना हाकलून देण्यात आलं होतं आणि जगाच्या पाठीवर 2 हजार वर्ष ते वेगवेगळ्या देशात हिंडत होते. ते रशिया, जर्मनी तसेच युरोपमध्ये गेले. ते जगात जिथं जिथं गेले तिथं तिथं त्यांचा छळ करण्यात आला. एकट्या जर्मनीमध्ये हिटलरने 60 ते 70 लाख ज्यू लोकांना मारलं; मात्र असं असताना देखील या जगाच्या पाठीवर एकमेव असा देश होता जिथं त्यांना आश्रय मिळाला तो म्हणजे भारत देश आणि या भारतात आजही अनेक इस्रायली लोक हे राहत आहेत. (Israel Palestine Conflict)

इस्रायलींमुळे ना दंगली, ना भांडणे: या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे, ते ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी ते मिसळून गेले आणि यांना 'बेने इस्रायली' म्हटलं जातं. याचा अर्थ असा की आम्ही इस्राईलचे सुपुत्र आहोत. त्यांचं जे नाव आहे त्याप्रमाणे त्यांची वागणूक आहे. त्यांच्यामुळे आजपर्यंत ना दंगली झाल्या, ना भांडणे झाली. पुण्यातील रस्तापेठेत त्यांचं सिनेग्रा आहे आणि तिथं ते अनेक वर्षांपासून प्राथनेला एकत्र येत असतात. तसेच कोकण किनारपट्टीवर देखील या समाजाचे लोक हे सन्मानाने राहत आहेत. 1948 साली जेव्हा इस्राईल राष्ट्राची स्वतंत्र स्थापना झाली तेव्हा यातील बहुसंख्य लोक हे आपल्या राष्ट्रात गेले. काही अजूनही त्याठिकाणी राहत आहेत आणि या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे ते इथली भाषा बोलतात. किर्लोस्कर मासिक ज्यांनी तयार केले ते काही वर्षानंतर युद्धाबाबत इस्राईलला गेले असता तिथं त्या लोकांनी त्यांना सांगितलं की, बरेच दिवस झाले आम्ही तुमचे मासिक वाचलेलं नाही आणि हे शब्द त्यांनी मराठीत त्यांच्याशी बोलले असल्याचं उदाहरण यावेळी शेट्टे यांनी दिलं.

इस्राईल नागरिकांनी मिळविली हक्काची भूमी: जगात दोन प्राचीन धर्म सांगितले जातात. एक म्हणजे यहुदी, दुसरा म्हणजे पारशी. या पारशी लोकांचा देश म्हणजे परशिया आणि तेथून देखील त्या लोकांना आक्रमकांनी हाकलून दिलं. पर्शियन लोकांचा जो देश होता तो आज इराण म्हणून देश आहे आणि म्हणून आता जगात मूठभर फक्त पारशी लोक राहिले आहेत. पण, दुसरीकडे इस्राईल नागरिकांना बघितलं तर त्यांनी 2 हजार वर्ष स्वतःला हक्काची भूमी नसताना ती मिळवली आणि 1947-48 मध्ये इस्राईल राष्ट्राची निर्मिती केली असल्याचं यावेळी शेट्टे यांनी म्हटलं आहे.

शिवरायांच्या आरमार उभारणीत इस्रायलींचे सहकार्य: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत इस्रायली लोकांचे काही संदर्भ असल्याचं विचारलं असता ते म्हणाले की, इतिहासात अशा काही आख्यायिका आहेत ज्यात हा समाज खूप लढवैया समाज आहे. काही कथा सांगितल्या जातात की, त्यांचं जे शौर्य होतं ते पाहता त्याकाळी कोकण किनारपट्टीवर अरबांचं आक्रमण होत होतं. याचा धोका आपल्याला होता आणि त्यांच्याशी टक्कर देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रबळ असं आरमार तयार केलं होतं. त्या काळात हे इस्रायली लोक तिथं आले होते आणि त्यांचं शौर्य तसेच समुद्राचा अभ्यास पाहता आरमारासाठी त्यांचा उपयोग करता येईल का? असा विचार केला गेला. शेवटी शिवाजी महाराजांनी त्यांच्यातील काही लोकांना बोलावून त्यांना आरमार उभारणीची जबाबदारी दिली. महाराजांनी आरमार उभारणीत इस्रायली नागरिकांच्या बुद्धीचा आणि ज्ञानाचा वापर करून घेतला अशी आख्यायिका सांगितली जाते, असं देखील यावेळी शेट्टे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा:

  1. Vinayak Raut On Shinde Group : लोकसभा निवडणुकीच्यापूर्वीच 'मिंधे गटात मोठा भूकंप' - खासदार विनायक राऊत यांचा दावा
  2. Sanjay Raut Vs Nitesh Rane : संजय राऊत यांच्या बदनामीचा खटला; नितेश राणेंना कोर्टाचं समन्स
  3. Pregnancy Termination Plea : २६ आठवड्यांच्या गरोदर महिलेला गर्भपाताची परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Last Updated : Oct 17, 2023, 7:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.