ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड : पीपीई कीट घालून मनसेचे महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन

महापालिका प्रशासनाकडून कोरोना बाधित रुग्णांना व्हेंटिलेटर आणि आयसीयू उपलब्ध होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे मनसेने आज महापालिका प्रशासनाचा 'मनसे' स्टाईल निषेध नोंदवत आंदोलन केले.

pcmc
मनसेचे आंदोलन
author img

By

Published : Aug 19, 2020, 7:43 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना महामारीने थैमान घातले असून शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु, महापालिका प्रशासनाकडून व्हेंटिलेटर आणि आयसीयू उपलब्ध होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे मनसेने आज महापालिका प्रशासनाचा 'मनसे' स्टाईल निषेध नोंदवत आंदोलन केले. महानगर पालिकेच्या मुख्यगेटवर मनसे कार्यकर्त्यांनी पीपीई कीट घालून आंदोलन केले. यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर दररोज कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होण्याचे प्रमाणही गंभीर आहे. दररोज 20 ते 25 जणांचा मृत्यू कोरोनामुळे होत असल्याचं मनसेने म्हटले आहे. शहरातील सद्यस्थिती पाहता सरकारी व खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांनी दाखल झाले असल्याने तेथे आणखी उपचार घेण्यासाठी जागा उपलब्ध नाही.

यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना आर्थिक खर्च परवडत नसल्यामुळे किंवा अशा व्यक्तींना शहरामध्ये आयसीयु व व्हेंटीलेटरची सुविधा उपलब्ध होत नसल्याने कोरोना रुग्ण दगावत आहेत, असे मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाल. शहरामध्ये आत्तापर्यंत ६८५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तरी देखील ऑटो क्लटर व बालनगरी येथील कोविड सेंटर सुरू झाले नाही, ते लवकरात लवकर सुरू करावे असे मनसेकडून सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.