ETV Bharat / state

पुण्याची आरोग्य व्यवस्था राम भरोसे, मनसेचे आंदोलन - पुणे महापालिका बातमी

पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर खाटांचा अभाव असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे व साईनाथ बाबर यांनी पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत रुग्णांच्या वेषात प्रवेश केले. यावेळी त्यांनी रुग्णांच्या व्यथा सभेत मांडल्या.

corporator of MNS
corporator of MNS
author img

By

Published : Aug 5, 2020, 5:19 PM IST

पुणे - पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. मात्र, प्रशासनाकडून हव्या तशा सुविधा निर्माण करण्यात आल्या नाहीत. त्यामुळेच रुग्णांना उपचारासाठी खाटा मिळत नसल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. उपचारात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत मनसेचे नगरसेवक वसंत मोरे व साईनाथ बाबर यांनी पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत अत्यवस्थ रुग्णांची वेशभूषा करत पालिकेच्या सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर महापौरांसमोर कोरोना बाधित रुग्णांची व्यथा मांडली.

यापूर्वी वसंत मोरे व साईनाथ बाबर यांनी कोरोनाबाधितांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून महापालिकेच्या मुख्य इमारतीत खाटा टाकून आंदोलन केले होते. पण, तरीसुद्धा रुग्णांची हेळसांड होत असल्याचा आरोप करत त्यांनी आज (दि. 4 ऑगस्ट) पुन्हा एकदा महापालिकेच्या मुख्य सभेत हे आंदोलन केले.

दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची होणारी हेळसांड मुख्य सभागृहाच्या लक्षात आणून देण्यासाठी आम्ही अशाप्रकारे आंदोलन केल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. आज आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी हे आंदोलन केले . पण, जर अशीच परिस्थिती सुरू राहिली तर येत्या काळात सर्वसामान्य नागरिकही याठिकाणी येतील. त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागे व्हावे सर्वसामान्य रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.