दौंड (पुणे) - केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार जयकुमार गोरे यांनी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली. तसेच, कुल यांनी काही मागण्या यावेळी केल्या.
...या आहेत मागण्या
१. कोयना व टाटा धरणांद्वारे जलविद्युत वीजनिर्मितीसाठी कृष्णा खोऱ्यातील पूर्वमुखी पाणी पश्चिमेकडे वळविण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना जलविद्युत वीजनिर्मितीसाठी पूर्वेकडे कृष्णा, भीमा खोऱ्यातील पाणी अरबी समुद्राकडे नेले जात आहे. वास्तिवक पाहता या पाण्यावर पहिला हक्क असणाऱ्या कृष्णा, भीमा खोऱ्यातील नागरिकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. ही बाब आमदार कुल यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली.
हेही वाचा - ...तर जुलै महिन्याचा पगार नाही - पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त
२. संपूर्ण महाराष्ट्रात चिबाड, क्षारयुक्त शेतजमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यासंदर्भांत चिबाड शेतजमीन निर्मुलन, पृष्ठ भागावर व भुपृष्ठभागाखालील चर खोदून जादा पाण्याचा निचरा करणे, या संदर्भात एकात्मिक धोरण आखावे. तसेच, राज्यातील चिबाड, पाणथळ झालेल्या जमिनीचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात यावे.
३. जल जीवन अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजना नसलेल्या अधिकाधिक ग्रामपंचायतींचा समावेश व्हावा.
हेही वाचा - मावळमध्ये 8 वर्षांच्या मुलाच्या सेल्फीने घेतला वडिल-मामाचा बळी