पुणे - राज्यभरात आज (दि. 13 ऑक्टोबर) भाजपतर्फे मंदिरे उघडण्याबाबत आंदोलन करण्यात आले होते. राज्यातील अनेक मंदिराबाहेर संत, महंत, साधू आंदोलनाला बसले होते. शिर्डीमध्ये आंदोलनासाठी बसलेल्या संत, महंतांना आज सायंकाळी अटक झाली हे धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया आमदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
निदान पाच जणांना तरी साईबाबाच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊ द्या, अशी या संतांची इच्छा होती. हजारोंच्या संख्येने गेलेल्या प्रकाश आंबेडकरांना तुम्ही विठ्ठल मंदिरात जाऊ दिले. मध्यंतरी तिरुपतीचा एक शिष्टमंडळ शिर्डीत आले होते त्यांनाही तुम्ही दर्शन घेऊ दिले.पण, आज आंदोलन करणाऱ्या साधुसंतांची विनंती पोलिसांनी ऐकली नाही. ते वारंवार मुंबईत संपर्क करत असावेत, मुंबईतून नकारघंटा आली असेल आणि या संतांना अटक करण्यात आली. आता संत म्हणतांनाही अटक करण्यापर्यंत या सरकारची मजल गेली आहे. आता याची काही प्रतिक्रिया समाजामध्ये उमटेल त्याला तोंड देण्यासाठी सरकारने तयार राहावे. त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - मंदिरं बंद; उघडले बार…उद्धवा धुंद तुझे सरकार, भाजपाचे ‘लाक्षणिक उपोषण’