पिंपरी-चिंचवड (पुणे) - कृषी कायद्याच्या विरोधात मंगळवारी (दि. 8 डिसें.) शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या आंदोलनास देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला तर पिंपरी-चिंचवड शहरातील काही दुकाने सुरू होती. त्यामुळे या ठिकाणी संमिश्र प्रतिसाद पहायला मिळाला.
सर्वपक्षीय नेते आणि कामगार संघटांनांचे आंदोलन
पिंपरी-चिंचवड शहरात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालेला आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्वपक्षीय नेते आणि कामगार संघटांनी एक दिवसीय ठिय्या आंदोलन पुकारले होती. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कामगारांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या भारत बंदला प्रतिसाद दिला आहे.
पिंपरीच्या बाजारपेठेतील बहुतांश दुकाने होती सुरू
पिंपरीतील मुख्य बाजारपेठेतील नव्वद टक्के दुकाने सुरू होती. तर काही जणांनी दुकाने बंद ठेवत भारत बंदला पाठिंबा दर्शविला होता. तर, वाहतुकीवर देखील याचा फारसा परिणाम झालेला नाही. केवळ पिंपरीत चौकातील वाहतूक आंदोलन असल्याने दुपारपर्यंत वळवण्यात आली होती.
भारत बंदला पोलिसांचा चोख बंदोबस्त
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. यावेळी पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निकाळजे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - कौमार्य चाचणीची अनिष्ट प्रथा झुगारत आणखी एक विवाह
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल