ETV Bharat / state

Mister Gay India 2023 : कोल्हापूरचा विशाल पिंजानी ठरला 'मिस्टर गे इंडिया 2023'; दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व - श्याम कोन्नूर

Mister Gay India 2023 : पुण्यातील खराडीत आयोजित मिस्टर गे इंडिया २०२३ स्पर्धेत कोल्हापूरच्या विशाल पिंजानीनं विजेतेपद पटकावलं असून आता तो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये होणाऱ्या मिस्टर गे वर्ल्ड 2023 स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

Mister Gay India 2023
Mister Gay India 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 2:09 PM IST

कोल्हापूरचा विशाल पिंजानी ठरला मिस्टर गे इंडिया 2023

पुणे Mister Gay India 2023 : कोल्हापूर येथील विशाल पिंजानी यंदाचा 'मिस्टर गे इंडिया २०२३' ठरलाय. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये 27 ऑक्टोबरला होणार्‍या 'मिस्टर गे वर्ल्ड 2023' स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व तो करणार आहे. मिस्ट एलजीबीटीक्यू फाऊंडेशन आणि क्वीरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे काल खराडी येथील हॉटेल रँडिसन ब्ल्यू इथं या 'मिस्टर गे इंडिया २०२३' स्पर्धेचं आयोजन केलं होतं. केरळच्या अभिषेक विजयननं या स्पर्धेचं उपविजेतेपद पटकावलंय.

२० स्पर्धक सहभागी : या स्पर्धेत विविध राज्यातून २० स्पर्धक सहभागी झाले होते. विविध फेर्‍यांमध्ये यशस्वी होत विशाल व अभिषेक अंतिम फेरीत दाखल झाले होते. दोघांनीही उत्तम सादरीकरण करत, आपली सामाजिक जाणीव व समज दाखवत, एकमेकांना तगडी चुरस दिली. मात्र या अटीतटीच्या सामन्यात विशालनं हा खिताब जिंकला. यासह विशालला 'मिस्टर गे महाराष्ट्र' व अभिषेक याला 'मिस्टर गे केरळा' हा खिताब देऊन सन्मानित करण्यात आलंय.

"ही स्पर्धा केवळ ब्युटी पॅजेंट नाही, तर एलजीबीटीक्यू समुदायाला सक्षम करण्यासाठी, सन्मानानं जगण्याची संधी देणारं व्यासपीठ आहे. हे पॅजेंट सकारात्मक बदल घडवून जगण्यातील अडथळे दूर करून या तुच्छतेनं पाहिल्या जाणार्‍या समुदायाला मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी उपयुक्त ठरते. देशाच्या विविध भागातून आलेल्या स्पर्धकांनी आपली पार्श्वभूमी, अनुभव, आजवरचा प्रवास, प्रेरणा, अनेकांकडून मिळालेली मौल्यवान साथ, समुदायाला सन्मान देण्यासाठी जागृती करण्याचा विचार मांडत परीक्षक व उपस्थितांची मने जिंकलीत." - श्याम कोन्नूर

सर्वसमावेशक संयोजन : या स्पर्धेत मिस्ट एलजीबीटीक्यू फाऊंडेशनचे संस्थापक आणि 'मिस्टर गे वर्ल्ड इंडिया २०२०' श्याम कोन्नूर, फॅशन स्टायलिस्ट अँडी बर्वे, फॅशन कोरिओग्राफर चैतन्य गोखले, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या सोनाली दळवी, गुजरात येथील एलजीबीटीक्यू सामाजिक कार्यकर्ता प्रिन्स मानवेंद्र सिंग गोहील, अंकिता मेहरा, स्टँड अप कॉमेडीयन श्वेता मंत्री यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. तर श्रीराम श्रीधर यांनी संयोजन केले.

हेही वाचा :

  1. Mohan Bhagwat Comments : आपण मोठे आहोत ही भावना सोडावी लागेल-मोहन भागवत यांची मुस्लिमांवर टिप्पणी
  2. Tokyo Olympics : गे असल्याचा अभिमान! सुवर्णपदक जिंकल्यानंतर खेळाडूचा खळबळजनक खुलासा
  3. LGBT Rally In Pune : 'प्रेम प्रेम असत तुमचं आमचं...'; समाज आम्हाला कधी स्वीकारणार, एलजीबीटी समुहाचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.