ETV Bharat / state

पुण्यातून नऊ वर्षांपासून बेपत्ता असलेला तरूण छत्तीसगडमध्ये 'माओवादी कमांडर' - naxal from pune

संतोष शेलार २०१० साली नोव्हेंबर महिन्यात पुण्यातून बेपत्ता झाला होता. पोलीस संतोषच्या शोधात होते. परंतु, तो सापडत नव्हता. मात्र, आता तो छत्तीसगडमधील राजनांदगाव येथील तांडा एरिया कमिटीचा डेप्युटी कमांडर असल्याचे पुढे आले आहे.

माओवादी कमांडर
author img

By

Published : Jul 9, 2019, 12:57 PM IST

Updated : Jul 9, 2019, 1:24 PM IST

पुणे - नऊ वर्षांपूर्वी पुण्यातून बेपत्ता झालेला युवक माओवादी झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा, असे या तरुणाचे नाव आहे. छत्तीसगड येथील माओवादी संघटनेत तो सहभागी झाला आहे. पुण्यातील भवानी पेठेतील कासेवाडी भागात तो राहत होता.

खडक पोलीस तरुणाबद्दल माहिती देताना

संतोष शेलार २०१० साली नोव्हेंबर महिन्यामध्ये पुण्यातून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी पुण्यातील खडक पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा भाऊ संदीप शेलार याने दिली होती. संतोष पेशाने चित्रकार होता. तो कबीर कला मंचच्या शीतल साठे आणि सचिन माळी या दोघांच्या संपर्कात होता. २०१० साली तो पुण्यातून मुंबई येथे चित्रकला स्पर्धेसाठी गेला होता. त्यानंतर तो आजतागायत घरी परतला नव्हता.

२०१४ साली गडचिरोलीच्या जंगलात तो असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस संतोषच्या शोधात होते. परंतु तो सापडत नव्हता. सोमवारी छत्तीसगड पोलिसांनी माओवाद्यांची एक यादी जाहीर केली. त्यात संतोष शेलार हा माओवादी कमांडर असल्याची माहिती समोर आली आहे. राजनांदगाव येथील तांडा एरिया कमिटीचा तो डेप्युटी कमांडर असल्याचे छत्तीसगड पोलिसांच्या यादीत नोंद आहे.

महाराष्ट्र पोलिसांना याविषयी अद्याप कुठलीही माहिती देण्यात आली नाही. माहिती मिळाल्यास पुढील तपास करू, अशी माहिती खडक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांनी दिली.

Intro:नऊ वर्षापूर्वी पुण्यातून बेपत्ता झालेला युवक माओवादी झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे...संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा असे या तरुणाचे नाव आहे...छत्तीसगड येथील माओवादी संघटनेत तो सहभागी झाला आहे...पुण्यातील भवानी पेठेतील कासेवाडी भागात तो राहत होता...नोव्हेंबर 2010 मध्ये तो बेपत्ता झाला होता...याप्रकरणी पुण्यातील खडक पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा भाऊ संदीप शेलार याने दिली होती. Body:संतोष शेलार हा कबीर कला मंचच्या शीतल साठे आणि सचिन माळी या दोघांच्या संपर्कात होता.तो स्वता चित्रकार होता...2010 साली तो पुण्यातून मुंबई येथे चित्रकला स्पर्धेसाठी गेला होता. त्यानंतर तो आजतागायत घरी परतला नाही...2014 साली गडचिरोलीच्या जंगलात तो असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती...पोलीस त्याच्या शोधात होते...पण तो सापडत नव्हता..सोमवारी छत्तीसगड पोलिसांनी माओवाद्यांची एक यादी जाहीर केली..त्यात संतोष शेलार हा माओवादी कमांडर असल्याचो माहिती समोर आली आहे..राजनांदगाव येथील तांडा एरिया कमिटीचा तो डेप्युटी कमांडर असल्याचे छत्तीसगड पोलिसांच्या यादीत म्हटले आहे..Conclusion:मात्र महाराष्ट्र पोलिसांना याविषयी छत्तीसगड पोलिसांनी अद्याप कुठलीही माहिती देण्यात आली नाही..माहिती मिळाल्यास पुढील तपास करू अशी माहिती खडक पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उत्तम चक्रे यांनी दिली.

Last Updated : Jul 9, 2019, 1:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.