पिंपरी-चिंचवड - दुचाकीचा धक्का लागला म्हणून कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचा खून केल्या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना 31 डिसेंबर रोजी घडली असून कानशिलात लगावली म्हणून अल्पवयीन मुलांनी सुनील शिवाजी सगर यांचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाल आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलांनी सुनील यांना धक्काबुकी आणि लाथा मारत दुकानातून बाहेर काढून त्यांचा सिमेंटचे गट्टू डोक्यात घालून खून केला आहे.
14 आणि 17 वर्षीय अल्पवयीन मुलांनी त्याच्या मित्राकडून ऍक्टिव्हा दुचाकी घेऊन गेले होते. अल्पयीन मुलं हे दुचाकीवरून जात असताना जाधववाडी शिवरस्ता येथे सुनील सगर यांना दुचाकीचा धक्का लागला. सुनील यांनी एकाच्या कानशिलात लगावली. अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे. त्याचा राग आल्याने अल्पवयीन मुलांनी सुनील यांना उलट मारहाण केली. सुनील हे त्यांच्या तावडीतून सुटून पळून गेले आणि एका किराणा दुकानात लपले. तेव्हा, त्यांचा पाठलाग करून अल्पवयीन मुलांनी किराणा दुकानातून धक्काबुकी आणि लाथा मारून सुनील यांना बाहेर काढले. भर रस्त्यावर आणून 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने त्यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून केला. अल्पवयीन मुलांनी गर्दी जमा झाल्याने तेथून पळ काढला. त्यानंतर, चिखली पोलिसांनी दोन तपास पथके तयार केली. दरम्यान, दुचाकी कोणाची होती आणि ती कोणाला दिली यावरून आरोपींचा शोध लागला.
हेही वाचा - Pune Accident : चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड कोसळून 16 वर्षीय मुलगा गंभीर जखमी; घटना सीसीटीव्हीत कैद