पुणे - शहरात आलेला पूर हा अनधिकृत बांधकामांमुळेच आला आहे. नालेच्या नाले नष्ट केल्यामुळे याला अनधिकृत बांधकामे कारणीभूत आहेत. या नाल्याच्या जागी बांधकाम केल्याने त्याचीही चौकशी केली जाईल, असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पाटील यांनी शुक्रवारी पुण्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली त्यानंतर ते बोलत होते. पुणे जिल्ह्यात झालेल्या पूर दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा- जलमय पुणे: अग्निशमन दलाच्या जवानाने वाचवले दीड वर्षाच्या बाळाचे प्राण
दरम्यान, या घटनेचे विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. पालकमंत्री हे पूरग्रस्त भागात गेले नाही, असा आरोप केला जातो. मात्र, राजकारण न करता अशा संकटाच्या काळात हाताला हात घालून काम केले पाहिजे. पुण्यामध्ये पूरग्रस्त भागात पाहणी करत असताना नागरीकांचा कुठलाही रोष नव्हता. काही लोक राजकीय हेतूने गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत होते, असे सांगत पूरग्रस्त भागात लोकांशी व्यवस्थित बोलणे झाले आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
हेही वाचा-पुण्यात अतिवृष्टीमुळे अनेक संसार उघड्यावर, समाजसेवी संस्थांनी दिला मदतीचा हात