ETV Bharat / state

Chandrakant Patil in Pune : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली खासदार गिरीश बापटांची भेट; कार्यकर्त्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

author img

By

Published : Mar 5, 2023, 4:17 PM IST

राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप खासदार गिरीश बापट यांच्या भेट घेतली. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत कसबा पोटनिवडणूकीत पराभूत झालेले भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे देखील उपस्थित होते. यावेळी मंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघनेचे काम वाढविण्यासाठी महत्वाच्या सूचना झाल्या आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुक निकालानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी रात्री उशिरा खासदार गिरीश बापट आणि भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांची भेट घेतली. यावेळी हेमंत रासने यांच्या भेटीत कार्यकर्त्यांना संवाद साधून पुन्हा जोमाने कामाला लागण्याची सूचना मंत्री पाटील यांनी केल्या.

गिरीश बापट यांच्यासोबत भेट: हेमंत रासने यांच्या भेटीपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली‌. यावेळी पाटील यांनी खासदार बापट तब्येची विचारपूस केली. काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा असे गिरीश बापट यांना मंत्री चंद्रकांत पाटीलांनी सांगितले. दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हेमंत रासने आणि त्यांच्या कुटुंबियांशी ही संवाद साधला. त्यांनाही कामाला लागण्याची सूचना केली. त्यावर हेमंत रासने यांच्या पत्नी मृणाली रासने यांना निवडणुकीच्या काळात सर्वांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले. यातून सर्वांचे रासने कुटुंबासोबत अतूट नाते निर्माण झालं आहे. हे नाते जपण्यासोबतच अजून पुढे वाढविणार, असल्याचा संकल्प यावेळी मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पोट निवडणुकीत भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले. संघर्ष हा भाजपचा स्थायीभाव आहे. संघर्षाच्या बळावरच आपण अनेक आव्हानांचा अतिशय समर्थपणे सामना करुन परतवुन लावली. पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या सदैव पाठीशी आहे. त्यामुळे खचून न जाता सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे, आगामी काळात विजय आपलाच आहे, असा विश्वास मंत्री पाटील यांनी दिला. यानंतर सर्वांनी आता जिंकेपर्यंत लढायचे, असा निर्धार व्यक्त केला.

हेमंत रासनेंचा पराभव: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा अनपेक्षित पराभव झाला. या पराभवानंतर काही कार्यकर्ते निराश झाले होते. शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हेमंत रासने यांच्या घरी भेट दिली. या भेटीवेळी रासने यांच्या घरी कसबा मंडलाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: Balasaheb Thorat on Govt : कसब्यातून बदलाचे वारे सुरू झाले; 2024 मध्ये संपूर्ण बदल पाहायला मिळेल - बाळासाहेब थोरात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.