शिर्डी Ramnath Kovind Visits Shirdi : भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज शिर्डीत येत पत्नी कविता कोविंद यांच्यासह साई मंदिरात जावून साईंच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी कोविंद यांनी साईबाबांच्या समाधीवर वस्त्रही अर्पण केलं. तसंच याप्रसंगी साईबाबा संस्थानचा वतीनं शाल आणि साईबाबांची मूर्ती देवून कोविंद यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
काय म्हणाले कोविंद : दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना कोविंद यांनी, "मी माझं सौभाग्य मानतो की नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डीला येवून साईबाबांच दर्शन घेता आलं. संपूर्ण मानवजातीच्या सुख शांतीसाठी साईंच्या चरणी प्रार्थना केली. तसंच देश आणि अखंड जग ज्या आव्हानांना सामोरं जात आहे, त्या आव्हानांना पेलण्यासाठीदेखील साई चरणी प्रार्थना केली असून येणारं नवीन 2025 हे वर्ष संपूर्ण मानव जातीसाठी सुखकारक आणि भरभराटीचं जावो," अशी प्रार्थना साई चरणी केल्याचं म्हटलंय.
आतापर्यंत कोणते राष्ट्रपती आले शिर्डीत : देशाचे राष्ट्रपती असताना शंकरदयाल शर्मा, प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद आणि विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे.
हेही वाचा :