मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशाची आर्थिक राजधानी आता सज्ज झाली आहे. गृह विभागानं 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बार, क्लब, पब, हॉटेल पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिलीय. त्यामुळं बार तसंच पब चालकांकडून देखील ग्राहकांना विविध ऑफर देण्यात येत आहेत. मुंबईत अनेक जण पर्यटनासाठी येत असतात. अशातच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बार, पबमध्ये चांगल्या ऑफर सुरू आहेत का? याचा देखील अनेक जण शोध घेतात. तुम्ही देखील अशाच शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
सेलिब्रेशनसाठी विशेष ऑफर : जुहू येथील एका बारसह पबनं ग्राहकांना विशेष ऑफर जाहीर केलीय. 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी चार डीजे प्लेयर विशेष आकर्षण म्हणून बोलवण्यात आले आहेत. सोबतच 'अनलिमिटेड प्रीमियम लिकर' असं पोस्टर देखील त्यांनी लावलं आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर याबाबतचं प्रमोशन केलं असून, बुक माय शो व झोमॅटो यावरून तुम्हाला बुकिंग करता येणार आहे. सोबतच त्यांनी एक संपर्क क्रमांक देखील दिला असून, तुम्ही त्यावरून देखील संपर्क साधू शकता. जुहू रोड येथे हे ठिकाण असून 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी एक उत्तम पर्याय आहे.
अनलिमिटेड लिकरसह फूड : दुसऱ्या एका अंधेरी बार स्थित 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी विशेष ऑफर जाहीर केलीय. येथील विशेष आकर्षण म्हणजे यांनी दोन प्रसिद्ध डीजे बोलावले असून ते जबरदस्त मनोरंजन करणार आहेत. सोबतच यांनी अनलिमिटेड लिकर आणि फूड देखील ऑफर केले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून, या पोस्ट नुसार फिमेलसाठी 2 हजार रुपयात अनलिमिटेड लिकर आणि फूड देण्यात आले आहे. तर, साडेतीन हजार रुपयात मेलसाठी अनलिमिटेड लिकर आणि फूड तर कपलसाठी साडेचार हजार रुपयात अनलिमिटेड लिकर आणि फूड अशी ऑफर देण्यात आली आहे.
कपलसाठी वेगळी ऑफर : अंधेरी पूर्वेतील तिसऱ्या एका पबनं 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी मुलींच्या ग्रुपसाठी वेगळ्या ऑफर, मुलांच्या ग्रुपसाठी वेगळ्या ऑफर तर कपलसाठी वेगळ्या ऑफर जाहीर केल्या आहेत. इथं तुम्हाला जायचं असल्यास आधी बुक माय शो किंवा पेटीएम इनसाईडर या ॲपवरून बुकिंग करावं लागणार आहे. यासाठी त्यांनी एक संपर्क क्रमांक देखील जाहीर केला आहे. इथं देखील प्रीमियम क्वालिटीची लिकर आणि फूड अनलिमिटेड मिळणार आहे.
रूफ-टॉप डीजे : कांदिवली स्थित रेस्टॉरंट बारमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी विशेष ऑफर देण्यात येत आहे. इथं तुम्हाला मित्र-मैत्रिणींसोबत जायचं असल्यास आधी टेबल बुक करणं आवश्यक आहे. इथं तुम्हाला रूफ-टॉप डीजेवर थिरकण्याची संधी मिळणार आहे.
साकीनाका स्थित पबमध्ये तुम्हाला पार्टीसाठी दोन फ्लोअर मिळणार आहेत. एका फ्लोअरवरती लाईव्ह डीजे असून तर दुसऱ्या फ्लॉवरवर लाईव्ह सिंगिंग सुरू असणार आहे. या पबनं देखील विशेष ऑफर जाहीर केली असून इथं अनलिमिटेड फूड आणि अनलिमिटेड ड्रिंक अशा ऑफर देण्यात आल्या आहेत. इथं महिलांसाठी अडीच हजार रुपयात अनलिमिटेड ड्रिंक आणि अनलिमिटेड फूड अशी ऑफर आहे. तर पुरुषांसाठी साडेतीन हजार रुपयात अनलिमिटेड फूड आणि अनलिमिटेड ड्रिंकची ऑफर आहे. तुम्ही जर कपल म्हणून इथं जात असाल तर तुम्हाला पाच हजार रुपयात अनलिमिटेड फूड आणि अनलिमिटेड ड्रिंक मिळणार आहे. मात्र, इथं जाण्यासाठी तुम्हाला प्री बुकिंग करणं गरजेचं आहे.
हे वाचलंत का :