ETV Bharat / state

Chandrakant Patil : एअरबस प्रकल्प गुजरातला, मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले....

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Uddhav Thackeray and Aditya Thackeray) हे आत्ता शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे. पण त्यांना उशिरा कळाले की, लोकांची दुःख कळण्यासाठी फिल्डवर जावे लागते. असे देखील यावेळी पाटील (Minister Chandrakant Patil criticized) म्हणाले.

Chandrakant Patil
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Oct 28, 2022, 1:14 PM IST

पुणे : राज्यात वेदांत फॉक्सकॉन पाठोपाठ आता एअरबस हा प्रकल्प देखील गुजरातला गेला आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून शिंदे सरकारवर टिका केली जात आहे. यावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले की - मला बऱ्याच गोष्टी या तुमच्याकडून कळतात. तुमच्या कडूनच मला कळाल मी आत्ता याबाबत नीट माहिती घेतो. असे यावेळी पाटील (Chandrakant Patil on Airbus project) म्हणाले.

प्रतिक्रिया देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

फराळ स्नेहमेळावा : स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्यावतीने दिवाळी फराळ स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी पाटील यांना बच्चू कडू यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले की -अश्या प्रकारचे वाद हे जिवंत माणसांमध्ये होतच असतात. त्या वादाचे रूपांतर मनभेदात होऊ नये, यासाठी नेत्यांनी प्रयत्न करावे. या दोन नेत्यांचे वाद मनभेदापर्यंत जाणार नाही. याची काळजी घेण्यासाठी आमचे नेते सक्षम आहे.

विचारांची लढाई पाहिजे : यावेळी पाटील यांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता, ते म्हणाले की - काय घडले आहे मला माहित नाही. सकाळी उठल्यापासून कार्यक्रम असतात, म्हणून आत्ता मी माहिती घेऊन सांगतो. साध्या नोटांवर फोटो बदलाबाबत जी चर्चा सुरू आहे, त्यावर आणि शिवसैनिकांकडून राणे यांचा फोटो व्हायरल केला जातो आहे. याबाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की दोन विरोधी पक्ष असतात. ते बऱ्याच वेळेस विचारांच्या आधारे विरोधक असतात. त्यामुळे विचारांची लढाई लढली पाहिजे.अश्या पद्धतीने वयक्तिक पद्धतीने येऊन टीका टिप्पणी करू नये. सर्वसामान्य नागरिकांना याबाबत चिंता वाटते.

ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर : यावेळी पाटील यांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Uddhav Thackeray and Aditya Thackeray) हे आत्ता शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले की -आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना उशिरा कळाले. महात्मा गांधी सारखे नेते तयार झाले ते देश फिरले, सर्वसामान्य नागरिकांशी बोलले, त्यांची मने जिंकली. पण यांना असे वाटत होते की मातोश्रीमध्ये थांबूनच लोकांची मने कळतात. त्यांची दुःख कळतात. पण आत्ता त्यांना साक्षात्कार झाला आहे. चांगली गोष्ट आहे. अश्या वेळेस जेव्हा प्रत्यक्ष फिल्डवर जातात. तेव्हा काही मागण्या देखील कराव्या लागतात. पण आपण सत्तेत असताना या गोष्टी केल्या नाही. याची जाणीव असली पाहिजे. असे देखील यावेळी पाटील (Minister Chandrakant Patil criticized) म्हणाले.

शिक्षकांचे आंदोलन : शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. याबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की - आंदोलन करण्याचे काहीही कारण नाही. बऱ्याच वर्षांनी 2 हजार 88 जागा भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. 2017 साली जेव्हा किती गरज आहे ही जेव्हा अभ्यासली गेले, तेव्हा 8 हजार प्राध्यापक हवे होते. त्यातील 2 हजार 88 प्राध्यापक भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे देखील यावेळी पाटील म्हणाले.

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करायची : यावेळी पाटील यांना आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता, ते म्हणाले की -विरोधकांनी अश्या प्रकारे सत्ताधाऱ्यांवर टीका करायची असते. त्याशिवाय लोकांमध्ये हा भाव जात नाही, की ते आपले प्रतिनिधित्व करत आहे. ते सत्तेत असताना करण्यासारख्या खूप गोष्टी होत्या त्या त्यांनी केल्या नाही. याची जाणीव त्यांना पाहिजे. त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्याचा नक्कीच विचार करू. असे देखील यावेळी पाटील (Chandrakant Patil criticized Aditya Thackeray) म्हणाले.

लोकशाहीत मेजोरीटी पाहिजे : रोहित पवार म्हणाले होते की राज्यात अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून बघने आवडेल. यावर पाटील यांना विचारलं असता, ते म्हणाले की -लोकशाहीमध्ये कोणीही अशी इच्छा व्यक्त करू शकतो. यात काहीही हरकत नाही. पण होणे नाही होणे यासाठी लोकशाहीत मेजोरीटी पाहिजे असते.अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्यासाठी महाविकास आघाडीला 2024 मध्ये मेजोरीटी आणावी लागेल. पण 24 ला तिन्ही पक्ष एकत्र राहणार का ? हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. असे देखील यावेळी पाटील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.