पुणे - शहरात वाढत असलेल्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर प्रशासनाकडून आजपासून मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. संध्याकाळी 6 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच दिवसाला जमावबंदीदेखील लागू करण्यात आली आहे. आजपासून लावण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनमुळे दरोरोज बाजारपेठेत होणारी गर्दी कमी झाली असून बाजारात सकाळच्या वेळेस तुरळक गर्दी पाहायला मिळत आहे.
नागरिकांच्या मनात भीती
शहरात सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाने नागरिकांच्या मनात भीती वाढत चालली आहे. बाजारपेठेतदेखील नागरिकांकडून मास्क, तसेच सोशल डिस्टनसिंगचा वापर होत आहे. छोट्याततील छोटे आणि मोठ्यातील मोठे व्यापारी देखील दुकानात सॅनिटायझरचा वापर करत आहेत. विना मास्क फिरणाऱ्या लोकांना व्यापाऱ्यांनी वस्तू विकण्यास नकार दिला आहे.
मिनी लॉकडाऊनमुळे नुकसान पण प्रशासनाला सहकार्य करणार
वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर लावण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनमुळे आमचे प्रचंड नुकसान होणार आहे. नुकसान जरी होत असेल तरी आम्ही प्रशासनाला सहकार्य करणार आहोत आणि प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीचा काटेकोरपणे पालन करणार असल्याची भूमिका महात्मा फुले मंडईतील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - आरोग्य अधिकाऱ्यांनीच केले रूग्णालयातील साहित्य लंपास; चोरीचा गुन्हा दाखल करण्याचा जितेंद्र आव्हाडांचा इशारा