ETV Bharat / state

Monsoon Update: शेतकऱ्यांनो पेरणी करताय; जरा थांबा, ही बातमी पाहा - शेतकर्‍यांना वेध लागतात ते पेरणीचे

जून महिना सुरू झाला की, शेतकर्‍यांना वेध लागतात ते पेरणीचे तसेच पावसाचे. अशात शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

Monsoon Update
राज्यात पेरणी सुरू
author img

By

Published : Jun 26, 2023, 7:37 PM IST

माहिती देताना सुनील चव्हाण

पुणे : राज्यात दोन दिवसापूर्वीच पावसाला सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले की, जरी पावसाला सुरवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये. असे राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.

राज्यात आतापर्यंत 25 टक्के पाऊस : याबाबत सुनील चव्हाण म्हणाले की, यंदाच्या वर्षी 21 जून पर्यंत पावसाचे प्रमाण हे खूपच कमी होते. पण या चार दिवसात 36 एमएम इतका पाऊस पडला आहे. जून महिन्याच्या सरासरी पावसाचा अंदाज बघितला तर दरवर्षी जून महिन्यात 207 एमएम पाऊस पडतो. पण यंदा आतापर्यंत 53 एमएम पाऊस पडला आहे. म्हणजेच आतापर्यंत यंदा सरासरीच्या 25 टक्के पाऊस पडला आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 47 हजार हेक्टरवर पेरणी देखील झाली आहे. पण शेतकऱ्यांनी घाई न करता जो पर्यंत 100 एमएमच्या पुढे पाऊस पडत नाही, तसेच जोपर्यंत जमीन पुर्णत ओली होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये असे आवाहन, कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

पावसाचे प्रमाण कमी : आता काही भागात भाताची पेरणी झाली आहे. तसेच धुळे आणि जळगाव येथे काही प्रमाणात कापसाची पेरणी झाली आहे. आता वेधशाळेचे अंदाजही सकारात्मक असून काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. तर नाशिक तसेच मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अजूनही कमी आहे. त्यामुळे पाऊस चांगला झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असे यावेळी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

बी-बियाणे उपलब्ध : तसेच बाजारात देखील मुबलक प्रमाणात खते, बियाणे, कीटकनाशके उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना जर बी-बियाणे मिळवण्यात अडचणी येत असतील तर, त्यांनी थेट कृषी विभागाशी संपर्क साधावा असे देखील यावेळी चव्हाण म्हणाले.

हेही वाचा -

  1. Gaurikund केदारनाथच्या मार्गातील डोंगरावरील ओढ्याला आले नदीचे रुप पाहा व्हिडिओ
  2. Maharashtra Weather Update: येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मध्यभारतात मुसळधार पाऊस... हवामान विभागाचा इशारा
  3. Monsoon Update : राज्यात अखेर मान्सून सक्रिय; पुढील पाच दिवस 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.