पुणे : पुणे गुन्हे शाखेने 2 कोटी 21 लाखांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले आहे. पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे. ते मध्य प्रदेशातील रतलाम येथील असून पुण्यात या अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी त्यांचा वापर होणार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यापूर्वीच या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. अटक केलेल्या आरोपी नाव आजाद शेरजगान खान, (वय ३५ वर्षे), रा. पिपलखेडी, ता. अलोट जि. रतलाम, राज्य मध्य पद्रेश, थाना बरखेडाकला, नागेश्वर रामेश्वर प्रजापती, (वय ३५ वर्षे), रा. ता. अलोट, जि. रतलाम, राज्य मध्य पद्रेश गाव खजुरी- देवडा, थाना, आलोट तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक असून, त्यांच्या ताब्यातुन २ कोटी २१ लाख ९२ हजार ५०० रुपायाचे चे अंमली जप्त करण्यात आले आहे.
सापळा रचुन तीघांना अटक : पुणे पोलिसांकडून सध्या अंमली पदार्थविरोधी मोहीम सुरू आहे. त्यामध्ये पुणे पोलिसांना माहिती मिळाली होती की, मध्य प्रदेशातील दोन तरुण एक अल्पवयीन मुलगा या तिघांकडून ड्रग्स विक्रीसाठी येत आहेत. त्या माहितीनुसार सापळा रचून या तिघांनाही पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातला एक मुलगा हा अल्पवयीन आहे तर दोन हे 35 वर्षाचे तरुण असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. परंतु हे ड्रग्स नेमके कशासाठी आणले याची चर्चा पुण्यात होत आहे. कारण आज पुण्यात ए. आर. रहेमान यांची फार मोठी कॉन्सर्ट आहे. त्यासाठी तर हे आले नाही का? अशी चर्चा सुद्धा आता होत आहे. पुण्यात शैक्षणिक माहेरघर म्हटले जाते. पुण्यात अनेक कॉलेजेस महाविद्यालयांमध्ये तरुण-तरुणी आहारी गेलेले दिसतात. त्याच ठिकाणी यांचा मुख्य ग्राहक वर्ग असतो. परंतु अमली पदार्थ विरोधी पथकाच्या मोहिमेमुळे अशा कारवाई रोज होत आहेत. गेल्या चार महिन्यात सुद्धा अशा कारवाई होत आहेत. परंतु याचा संबंध काही कॉलेजेस किंवा पार्टीशी आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
गेल्या चार महिन्यापासून 3 मोठ्या कार्यवाही करण्यात आले असून 41 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे. एक कोटी साठ लाखांचे माल सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील अमली पदार्थाचा तस्कराचा बाजार हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार करत असतात. परंतु याच्या मास्टरमाईन पर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अपयश येते. सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा.सह पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे - १. पुणे शहर, श्री. सुनिल पवार यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा. पो. निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे, योगेश मोहिते व संदेश काकडे यांनी केली आहे.
हेही वाचा - Building Collapsed In Bhiwandi: इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २० तासानंतर सुटका, बचाव पथकाने जन्मदिनीच दिले 'जीवदान'