ETV Bharat / state

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 'पुणेकर अगेंस्ट कोरोना' अभियान; रेड झोनमध्ये करतायेत वैद्यकीय तपासणी

author img

By

Published : May 21, 2020, 8:44 PM IST

पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तीन हजारावर जाऊन पोहोचली आहे. रोज नवीन रुग्ण सापडत आहेत. या काळात मदतीसाठी अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था पुढे येत आहेत. अशातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही याकामी पुढाकार घेतला आहे.

pune
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 'पुणेकर अगेंस्ट कोरोना' अभियान

पुणे - दिवसेंदिवस पुण्यात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तीन हजारावर जाऊन पोहोचली आहे. रोज नवीन रुग्ण सापडत आहेत. याचा ताण वैद्यकीय सेवेवर पडताना दिसत आहे. त्यामुळे मदतीसाठी अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था पुढे येत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही याकामी पुढाकार घेतला आहे.

संघ स्वयंसेवकांनी पुण्यातील रेड झोन परिसरातील घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमाद्वारे आतापर्यंत एक लाखाहून अधिक नागरिकांची वैद्यकीय तपासणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. या तपासणीदरम्यान एक हजारहून अधिक नागरिक कोरोना संशयीत आढळले असून, त्यांची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला देण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या उपक्रमात तरुणाईचा सहभाग आहे. २४ ते ४० वयोगटातील हे तरुण वैद्यकीय, इंजिनिअर, आयटी या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आहेत. या सर्वांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने विमा काढण्यात आला आहे. सुरक्षीततेच्या दृष्टीने आवश्यक असणारी सर्व साधनसामग्री दिल्यानंतरच या तरुणांना उपक्रमात सहभागी करून घेतले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर म्हणाले की, कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दाट लोकवस्ती असणाऱ्या भागातील नागरिकांचे स्क्रिनिंग करण्याचा निर्णय घेतला. मंगळवार पेठेतून या अभियानाला सुरुवात झाली. महापालिका कर्मचारी, पोलीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथक यांनी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन तपासणी केली.

आतापर्यंत शहरातील 185 ठिकाणी ही तपासणी करण्यात आली. यामध्ये 324 डॉक्टर, 1 हजार 73 स्वयंसेवक, 200हून अधिक महापालिका कर्मचारी आणि दीडशेहून अधिक पोलीस मित्र सहभागी होते. भारतीय जनता संघटना, पीपीसीआर यासारख्या संघटनांनी वैद्यकीय साधने उपलब्ध करून दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.