दौंड(पुणे) - दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. आज पहाटे चार साडेचार वाजण्याच्या सुमारास सम्राट (गोदावरी ) पेपर मिल कंपनीच्या पेपरला आग लागल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली . तब्बल चार तासानंतर ही आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत या आगीत कंपनीतील लाखो रूपयांचे पेपर जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही
हेही वाचा - केंद्र सरकार एकाधिकारशाहीच्या युगाची तुतारी फुंकत आहे; हे देशासाठी घातक!
अग्निशामक बंबांनी आग विझवली
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील सम्राट पेपर कंपनीतील पेपरच्या पुष्ठ्याला भीषण आग लागली. पेपर असल्याने आगीने काही क्षणात आगीने कंपनीच्या परिसरात पसरला गेला. आगीचे डोंब आणि धुराचे लोट आकाशात पसरले. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तातडीने कुरकुंभ पोलीस चौकीचे पोलीस हवालदार दत्तात्रय चांदणे, ए.एम.शिंदे, एम. बी. हिरवे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. कुरकुंभ औद्योगीक वसाहतीमधील दोन अग्नीशामक बंब आणि दौंड नगर पालिकेच्या अग्निशामक बंबांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.
कुरकुंभ परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न
कुरकुंभ येथील औद्योगीक वसाहतीत कंपन्यांना आग लागण्याच्या घटना या सातत्याने घडत आहेत. मात्र तरीही याबाबत नागरीकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने कसल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे कुरकुंभ, पांढरेवाडी, मुकादमवाडी, दौंड शहर, पाटस या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऎरणीवर आला आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवले यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट