पिंपरी चिंचवड Maratha Reservation : शहरातील आळंदी परिसरामध्ये एका व्यक्तीनं मराठा आरक्षण मिळावं, अनुकंपा तत्वावर मुलाला नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केलीय. त्यानं चिठ्ठी लिहित इंद्रायणी नदीमध्ये उडी मारून जीवनयात्रा संपली. ही घटना काल 27 ऑक्टोबर 23 शुक्रवार रोजी रात्री आठ वाजाच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री इंद्रायणी पत्रात या व्यक्तीचा शोध घेतला. व्यंकट ढोपरे (रा.नऱ्हे आंबेगाव,पुणे) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
इंद्रायणी नदीपात्रात घेतली उडी : तीर्थक्षेत्र आळंदी येथे काल शुक्रवारी व्यंकट ढोपरे पुण्याच्या नऱ्हे आंबेगाव भागातून माऊलीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांनी इंद्रायणी पात्रात उडी मारत आत्महत्या केली. उडी मारल्यानंतर तत्काळ काही वेळानंतर स्थानिकांनी आळंदी पोलीस ठाण्यात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलीस पथक, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र अंधार असल्याकारणानं रात्री अकरा वाजता शोधकार्य थांबविण्यात आलं. त्यानंतर आज सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात आलं. शोध मोहीम सुरू असताना सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह इंद्रायणी नदीमध्ये आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला.
मराठा आरक्षण मिळत नसल्यानं आत्महत्या : मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांना घरातच एक चिट्टी सापडली. त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. मी सरपंच असल्यापासून प्रयत्न करतो, तरी सरकार याला गांभीर्यानं घेत नाही. 2012 पासून माझ्या मुलाला अनुकंपावर नोकरी दिली जात नाही. आईच्या वडिलांच्या जागी त्याला नोकरी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. पण प्रशासन आम्हाला न्याय देत नाहीत. याचं नैराश्यातून मी आत्महत्या करीत आहे, असा आशय त्या चिठ्ठीत होता. त्यामुळं भोसरीत राहणाऱ्या जावयास याबाबत कळवण्यात आलं. तेंव्हा आळंदीत त्यांचा शोध घेताना बंधाऱ्यालगत त्यांची पिशवी, मोबाईल, गळ्यातील माळ, चप्पल अन ज्ञानेश्वरीमधील काही कागद सापडले. त्याच बंधाऱ्यात पोलीस, एनडीआरएफनं शोध घेतला. आज तिथंच त्यांचा मृतदेह आढळला.
हेही वाचा -
- Maratha Reservation Issue : मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्री शिंदेंना घरचा आहेर, ठाणे जिल्हा प्रमुख म्हणाले ....'असे' मराठा मुख्यमंत्री नकोच
- Mangesh Sable On Gunaratna Sadavarte :..अन्यथा ॲड. गुणरत्न सदावर्तेंना गंभीर परिणाम भोगावले लागतील; मंगेश साबळेंचा इशारा
- Manoj Jarange On PM : मराठा आरक्षणावर पंतप्रधान मोदींचं मौन; मनोज जरांगे पाटील म्हणाले...