पुणे : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधी बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानानंतर अनेक नेत्यांचे प्रतिक्रिया येत आहे.यावर आज फडणवीस म्हणाले की मी जे काही बोललो ते खरच बोललो. त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही लोकांनी काढले आहे. मी अजूनही अर्धच बोललेलो आहे. उरलेलं अर्धा योग्य वेळी बोलणार आहे. निश्चितपने मी मुख्यमंत्री होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले. ते काही काळ यशस्वी देखील झाले. माझं अभिमन्यू करण्याचा प्रयत्न जरी झालं असला तरी आज आधुनिक युग आहे. अभिमन्यूकडून आपण देखील बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहे. चक्रव्हिव तोडून आम्ही, एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं आहे असे, देखील यावेळी फडणवीस म्हणाले.
फडणवीसांनी घेतली गिरीश बापटांची भेट : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस म्हणाले की, खासदार गिरीश बापट आमचे नेते आहे. मागच्या वेळी देखील आमची भेट झाली होती.आजही मी त्यांना भेटलो आहे. मागच्या वेळेपेक्षा यंदा प्रकृतीही चांगली वाटली आहे. याच मलाही आनंद आहे. निश्चितच त्यांना कसबा पोटनिवडणुकीबाबत चिंता आहे. प्रकृतीच्या कारणाने ते जरी प्रचाराला येऊ शकत नसले तरी, त्यांनी काही टिप्स मला दिल्या आहे. आजारी असताना देखील त्यांचे बारीक लक्ष या निवडणुकीवर आहे. कसबा असो की चिंचवड या दोन्ही पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा विजयी होणार असा विश्वास त्यानी व्यक्त केला.
अमित शहा पुणे दौऱ्यावर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर आहे. यावर फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले की, अमित भाई या निवडणुकीसाठी येत नाहीये. ते शिवसृष्टीच्या पहिल्या लोकार्पणसाठी पुण्यात येत आहे. ते पुण्याला येत आहे. आम्ही मोदी या पुस्तकाचं प्रकाशन देखील त्यांच्या हस्ते करणार आहे. त्या व्यतिरिक्त ते निवडणुकीच्या प्रचारात कुठेही सहभागी होणार नाही.
सगळ्यांच्याच पाठिंब्याची गरज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या पाठिंब्यावर फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, सगळ्यांच्याच पाठिंब्याची गरज असते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका हिंदुत्ववादी केली आहे. त्यामुळे ते आत्ता हिंदुत्ववादीच्या ब्रॅकेटमध्ये येतात. त्यामुळे या ब्रॅकेटमध्ये आलेले सर्वजण आम्हाला चालतात.
शिवस्मारकाच्या कामावर स्थगिती : शिवस्मारक बाबत छत्रपती संभाजी राजे यांनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, त्यांना सर्वच गोष्टीचं ज्ञान आहे. त्याच काम सुरू झाले असताना सर्वाच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आणि त्या कामावर स्थगिती आली. आम्ही प्रयत्न करत आहोत की लवकरात लवकर याच काम सुरू व्हावे.
मोदींना टार्गेट करण्याचे काम : बीबीसीवर करण्यात आलेल्या छापेमारीवर आज काँग्रेसने आंदोलन केल आहे. यावर फडणवीस म्हणाले की अमित शाह यांनी सांगितले आहे. कितीही खोटे नरेटिव्ह तयार करण्याचे प्रयत्न केले तरी लोकांचा मोदींवर विश्वास आहे. 2002 पासून त्यांना काही नेत्यांच्या माध्यमातून तसेच काही माध्यम समूहाच्या माध्यमातून टार्गेट करण्याचं काम केले. तरीही मोदीजी अधिक तेजाने पुढे आले. आत्ता देखील अश्याच पद्धतीने नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केल जात आहे. याने काहीही फायदा होणार नाही, असे देखील यावेळी फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - Self Immolation : सात अपंगांनी दिला आत्मदहनाचा इशारा; जिल्हा परिषेदेसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त