ETV Bharat / state

पहिल्या सोमवारी भीमाशंकरात भक्तिमय वातावरणात शिवलिंगाचे दर्शन सुरू

पहिल्या सोमवारी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकर मंदिरात पहाटेची पूजा झाल्यानंतर भाविकांसाठी मंदीर खुले करण्यात आले आहे.

दर्शन घेताना भाविक
author img

By

Published : Aug 5, 2019, 6:33 AM IST

Updated : Aug 5, 2019, 6:50 AM IST

पुणे - पहिल्या सोमवारी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकर मंदिरात पहाटेची पूजा झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. देशभरातून आलेले भाविक मोठ्या भक्तिभावाने शिवलिंगाचे दर्शन घेऊन आपली बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण करत आहेत.

पहिल्या सोमवारी भीमाशंकरात भक्तिमय वातावरणात शिवलिंगाचे दर्शन सुरू

आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. श्रावणाची यात्रा ही आजपासून सुरू झाली आहे. दिवसभरामध्ये ३ वेळा आरती केली जाते. भीमाशंकर येथील शिवलिंग हे माता पार्वती व शिव शंकराचे एकत्रीत रूप असल्याने या ठिकाणी महिला व पुरुष हे दोघेही थेट शिवलिंगाचे दर्शन घेतात. आजपासून सुरू झालेली ही श्रावण मासातील यात्रा मोठ्या भक्तिभावाने नयनरम्य वातावरणात पार पडते.

भीमाशंकर हा परिसर अभयारण्यात येत असल्याने याठिकाणी येणाऱ्या भाविकांना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी देवस्थान प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भीमाशंकर येथे काही प्रमाणात पाऊस होत असून भाविकही या थंड वातावरणात पावसाचाही मनमोहक आनंद घेत आहेत.

Intro:पहिल्या सोमवारी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकर मंदिरात पहाटे ची पूजा झाल्यानंतर भाविक भक्तांसाठी मंदिर खुले करण्यात आली असून देशभरातून आलेले भाविक मोठ्या भक्तिभावाने शिवलिंगाचे दर्शन घेऊन आपली बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण करत आहेत

पहिला सोमवार पासून सुरू झालेली ही यात्रा भाविकांसाठी पहाटे चार वाजता सुरू होतं होऊन दिवसभरामध्ये तीन वेळा आरती केली जाते भीमाशंकर येथील शिवलिंग हे माता पार्वती व शिव शंकराचे एकत्रीत रूप असल्याने या ठिकाणी महिला व पुरुष हे दोघेही थेट शिवलिंगाचे दर्शन घेतात आज पासून सुरू झालेली ही श्रावण मासातील यात्रा मोठ्या भक्तिभावाने नयनरम्य वातावरणात सुरू आहे

भीमाशंकर हा परिसर अभयारण्यात येत असल्याने याठिकाणी येणाऱ्या भाविकांना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी देवस्थान प्रशासन व पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे भीमाशंकर येथे काही प्रमाणात पाऊस होत असून भाविकही या थंड गार वातावरणात पावसाचाही मनमोहक आनंद घेत आहेत

121--पुजारी

Body:wkt

Conclusion:
Last Updated : Aug 5, 2019, 6:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.