बारामती : परदेशात लोकप्रिय होत असलेला कोकणातील देवगड हापूस, केशर, बदाम यासारख्या आंब्यांना ऑस्ट्रेलिया,अमेरिका, इंग्लंड आधी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. फळांचा राजा म्हटला जाणारा महाराष्ट्रातील मदाळ आणि रसाळ आंब्याची बारामती बाजार समिती आणि रेनबो इंटरनॅशनल एक्सपोर्टने आजपर्यंत २०९ टन आंब्याची निर्यात केली आहे. ३० जुनपर्यंत १०० टन आंब्याची निर्यात करण्याचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे.
२०९ टन आंबा विमानाने पाठवला : ऑस्ट्रेलियाला, अमेरिका आणि इंग्लंडला या देशांमध्ये आतापर्यंत २०९ टन आंबा विमानाने पाठवला आहे. यंदा अवकाळी पावसामुळे आंब्याची आवक कमी असतानाही यंदाच्या हंगामात जवळपास १ हजार टन आंब्याच्या नियार्तीचे उद्दिष्ट बाजार समितीने ठेवले आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती निर्यातक्षम आंबा उत्पादकांचा आधार बनली आहे. यंदा महाराष्ट्रातील देवगड हापूस, केशर आणि पायरी तर कर्नाटकातील बदाम निर्यात होत आहेत. आंब्याच्या निर्यातीसाठी २३० ग्रॅम वजनाचा हापूस, २३० ग्रॅम वजनाचा केशर आणि २५० ग्रॅम वजनाचा बदाम निवडला जात आहे. इंग्लंडसाठी निर्यात केलेल्या फळांना गरम पाण्याची (व्हॉट वॉटर ट्रिटमेंट) प्रक्रिया केली जाते. अमेरिकेत निर्यात केलेल्या फळांवर विविध पॅरामीटर्सच्या चाचणीनंतर 'विकिरण उपचार' केले जातात. मग हा आंबा आकर्षक पद्धतीने पॅकिंग करून आकर्षक पद्धतीने निर्यात केला जातो.
यंदा १००० टन आंबा निर्यातीचे उद्दीष्ठ : मागील वर्षी ६४० टन आंबा निर्यात करण्यात यश मिळविले होते. यंदा १००० टन आंबा निर्यातीचे उद्दीष्ठ ठेवले आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरीका आणि लंडन येथे आंबा निर्यात केला आहे. लंडनला निर्यात सुरवातीच्या काळात चांगल्या प्रकारे झाली.मात्र, त्यानंतर तेथे पाऊस पडल्याने निर्यात १५ दिवस बंद होती.कोकणमधुन हापुस,पंढरपुर,सोलापुर मधुन केशर आंबा तसेच हैदराबाद येथुन हिमायत बदाम आंबा येत आहे.पुढील महिन्यात कच्छ भुज येथुन केशर आंबा सुरवात होणार आहे. ही निर्यात ३० जूनपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे निर्यातक्षम आंबा उत्पादकांना त्याचा फायदा होणार आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या विविध भागातून आयात केलेल्या आंब्यांची प्रतवारी करून स्थानिक बाजारपेठेत मागणीनुसार आंबे उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे आंबा उत्पादकांना जास्त भाव मिळतो,असे रेनबो इंटरनॅशनल चे सुभाष पवार यांनी सांगितले.
सोनोग्राफी’चा प्रथमच प्रयोग : उष्णतेमुळे फळे खराब होतात, ज्यामुळे ते सुकतात. अशी पिकलेली फळे नियार्तीसाठी निवडली जात नाहीत. कोकणातील हापूस आंबा पातळ सालीचा असतो. वाढत्या तापमानाचा या फळाच्या गुणवत्तेवर लगेच परिणाम होतो. उष्णतेमुळे फळे खराब होतात. पण मानवी डोळा देखील खराब झालेले फळ सहज ओळखू शकत नाही. बाहेरुन खराब आंबा लक्षात येत नाहि. यासाठी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच आंबा स्कॅनिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मशीनमध्ये आंब्याची चक्क ‘सोनोग्राफी’ केली जात आहे. सोनोग्राफी प्रमाणे आंब्याची तपासणी करुन खराब झालेली करून खराब होण्यास सुरवात झालेली, खराब फळे काढली जातात. परिणामी, निर्यातीची गुणवत्ता टिकून राहण्यास मोठी मदत होते, असे पवार यांनी सांगितले.
केशर आंब्याचे प्रमाण तुलनेने कमी : अमेरीकेला १०९ टन,तर ऑस्ट्रेलियाला लंडनमध्ये उर्वरीत आंबा निर्यात केला आहे. निर्यात अजुनही सुरुच आहे. यामध्ये स्थानिक केशर आंब्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली. लंडनमध्ये उर्वरीत आंबा निर्यात केला आहे. निर्यात अजुनही सुरुच आहे. यामध्ये स्थानिक केशर आंब्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.