पुणे - बालपणापासूनच ज्यांच्यासाठी कोणी नसतं त्यांच्यासाठी पोलीस नेहमीच तत्परतेने मदतीचा हात पुढे घेऊन जातात. सध्याच्या दिवाळी उत्सवात असाच मदतीचा हात मंचर पोलिसांनी पुढे केला आहे. आंबेगाव तालुक्यातील पळसटीका येथील अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांसमवेत मंचर पोलिसांनी दिपावली उत्सव साजरा केला. सोबतच येथील मुलांना दिवाळी फराळ, वह्या-पुस्तके, पेन अशा जीवनावश्यक वस्तू दिवाळी भेट म्हणून देण्यात आल्या.
नेहमीच आपलं कोण तरी असावं अशी अपेक्षा बाळगून आपलं सारं आयुष्य ही चिमुकली मुले अनाथ आश्रमात घालवतात. मात्र, सर्वत्र होणारे सण उत्सव यामध्ये या मुलांना कधीही सहभाग घेता येत नाही. अशातच या मुलांना आपुलकीची भावना दाखवत पोलिसांनी मदतीचा हात पुढे करत या चिमुकल्या मुलांसमवेत दीपावली उत्सव साजरा केला.
काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुका व सध्या दीपावली उत्सव अशा धावपळीच्या काळातही मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या संकल्पनेतून हा दीपावली उत्सव अनाथाश्रमात साजरा करत करण्यात आला. यावेळी अनाथाश्रमातील मुलांना दिवाळीनिमित्त फराळ, भेटवस्तू देण्यात आल्या, त्यामुळे मंचर पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
हेही वाचा - ओझरमध्ये पहाटेच्या सुमारास दोन बिबट्यांचे आगमन, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
हेही वाचा - सहा वर्षीय मुलीला बाळाचा सांभाळ करायला सांगून महिलेची आत्महत्या.. पतीच्या जाचामुळे उचलले पाऊल