पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये आजारपणाला कंटाळून एका 55 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना आज (शनिवारी) सकाळी उघडकीस आली. भरतलाल रामदास यादव (रा. आनंदनगर, चक्रपाणी वसाहत) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते गेल्या दोन वर्षांपासून आजाराने त्रस्त होते, अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरतलाल यांची दोन वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. तेव्हापासून ते हृदयविकाराने त्रस्त होते. अखेर शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यादव यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल नेले. मात्र त्यांचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता, अशी माहिती भोसरी पोलीस कर्मचारी बबन मोरे यांनी दिली. त्यांच्या पाठीमागे दोन मुले आणि त्यांचं कुटुंब आहे. पत्नीचा याअगोदरच मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या
भरतलाल यांची दोन वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. तेव्हापासून ते हृदयविकाराने त्रस्त होते. अखेर शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यादव यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल नेले. मात्र त्यांचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता