ETV Bharat / state

पिंपरीत मैला शुद्धीकरण प्रकल्पात उडी घेऊन आत्महत्या; घटना सीसीटीव्हीत कैद

author img

By

Published : Oct 9, 2020, 7:39 PM IST

महानगरपालिकेच्या मैला शुद्धीकरण केंद्रात एका व्यक्तीने उडी घेऊन आत्महत्या केली. ही व्यक्ती पिंपरीची रहिवासी आहे. त्याच्या आत्महत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ravi
रवी जानराव

पुणे : पिंपरीमध्ये एका 37 वर्षीय व्यक्तीने महानगरपालिकेच्या मैला शुद्धीकरण प्रकल्पात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. प्रकल्पातील सीसीटीव्हीत आत्महत्येची ही घटना चित्रीत झाली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महानगरपालिकेच्या मैला शुद्धीकरण केंद्रात एका व्यक्तिने उडी घेऊन आत्महत्या केली

रवी शाम जानराव (वय-37 रा. लिंक रोड पिंपरी), असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांनी दिली आहे. रवीने आत्महत्या केल्यानंतर काही मिनिटांनी तिथे एक व्यक्ती येतो. परंतु, घाबरून तो तिथून पळ काढत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. मृत रवी काही काम करत नव्हता व त्याला मद्यपानाचे व्यसन होते, असे पोलिसांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.