पुणे - मालेगाव येथे झालेल्या 2008 बॉम्बस्फोटाचा ( Malegaon Bomb Blast 2008 )निकाल अद्यापही लागलेला नाही. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने आदेश देऊनही खटल्याची सुनावणी रखडलेली आहे. ( Supreme Court and High Court on Malegaon Bomb Blast ) या खटल्याची सुनावणी जलद आणि निष्पक्षपणे करावी, अशी मागणी समीर शरद कुळकर्णी यांनी केली. पत्रकार परिषदेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
२००८ साली मालेगावमध्ये जो बॉम्ब स्फोट झाला त्या प्रकरणी अजूनही कुठलाच निकाल आलेला नाही. या खटल्यातील अनेक आरोपी आता हयात देखील नाहीत. आता तोच खटला नेमका निकाली कधी लागतो? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आजच्या पत्रकार परिषदेत कुलकर्णी पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ खंडपीठाने एप्रिल 2015मध्ये विशेष न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर न्यायाधीश एस. डी. टेकाळे, न्यायाधीश व्ही. एस. पाडाळकर आणि न्यायाधीश पी. आर. सित्रे यांच्या नियुक्तीअंतर्गत तीन विशेष न्यायालय झाली. मात्र, अद्यापही निर्णय लागलेला नाही. त्यामुळे यामध्ये आता जास्त वेळ न घालवता खटल्याची जलद सुनावणी घेऊन दैनंदिन पुर्ण वेळ सुनावणी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
त्याचबरोबर एका आठवड्यापूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या खटल्यात सरकारी वकील देवून लवकरात लवकर हा खटला मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे सांगितले आहे. मात्र, यात सुधारणा काहीच दिसत असेही ते म्हणाले.
कलंक पुसला जावा -
समीर कुळकर्णी हे या साऱ्या प्रकरणात संशियत आरोपी असुन ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. या सुनावणीसाठी ते आजही हजर राहतात. १५ वर्षात एकदाही मी न्यायालयाची तारीख चुकवली नाही. कारण मला माझ्यावर लगलेला कलंक पुसायचा आहे, असे मत समीर कुलकर्णी यांनी मांडले आहे.