पुणे - निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. जुन्नर, खेड, मुळशी, वेल्हा, भोर, मावळ, आंबेगाव, पुरंदर, दौंड या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या फळबागा या वादळात उद्धवस्त झाल्या आहेत.
मुळशी, हवेली तालुक्यातील कोंढावळे, वाघोली येथील शेतकरी राजेंद्र शितोळे यांच्या केळी आणि पपईच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्याच्या ४० झाडाचे आंबे गळून पडले आहेत. तसेच वाघोली परिसरातील शेतीलाही या वाऱ्याचा फटका बसला आहे. केळी व पपईच्या बागा कोलमडून पडल्या आहेत.