बार्बाडोस ENG Beat WI By 8 Wickets : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील पराभवानंतर इंग्लंड क्रिकेट संघानं T20 मध्ये जोरदार पुनरागमन केलं आहे. 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांनी दणदणीत विजय मिळवला. बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्यांनी 8 विकेट्सनं वेस्ट उंडिजचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली.
A brilliant chase! 🙌
— England Cricket (@englandcricket) November 9, 2024
An unbeaten century from Salt sees us over the line with 19 balls to spare! 💪
🌴 #WIvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/me7I1VoBEC
सॉल्टनं झळकावलं तिसरं शतक : या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजनं 20 षटकांत 9 गडी गमावून 182 धावा केल्या. इंग्लंडनं 183 धावांचं लक्ष्य अवघ्या 16.5 षटकांत पूर्ण केलं. त्यासाठी फिलिप सॉल्टनं 54 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय T20 मधील त्याचं हे तिसरं शतक आहे. विशेष म्हणजे त्यानं तिन्ही शतकं फक्त वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये इंग्लंडच्या फलंदाजाचं हे सातवं शतक आहे. एकट्या सॉल्टनं त्यापैकी तीन लावले आहेत. त्याच्याशिवाय ॲलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, जोस बटलर आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी 1 शतक झळकावलं आहे.
वेस्ट इंडिजचे फलंदाज अपयशी : इंग्लंडच्या या विजयात सॉल्टशिवाय साकिब महमूदच्या गोलंदाजीचाही महत्त्वाचा वाटा आहे. महमूदनं सुरुवातीच्या षटकांमध्येच वेस्ट इंडिजच्या टॉप ऑर्डरचा नाश केला. मात्र, विंडीजच्या मधल्या फळीच्या फलंदाजांनी काही चांगल्या खेळी केल्या. रोमारियो शेफर्ड आणि गुडाकेश मोटी यांनी मिळून वेगवान धावा केल्या पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्यांना रोखलं. परिणामी वेस्ट इंडिजनं 20 षटकांत 9 गडी गमावून 182 धावा केल्या. कर्णधार निकोलस पूरननं 29 चेंडूत 38 धावा, रोमारियो शेफर्डनं 22 चेंडूत नाबाद 35 धावा, मोटीनं 14 चेंडूत नाबाद 33 आणि आंद्रे रसेलनं 17 चेंडूत 30 धावा केल्या. इंग्लंडकडून शाकिबशिवाय आदिल रशीदनंही 3 बळी घेतले.
Salty, that is superb! 🙌
— England Cricket (@englandcricket) November 9, 2024
100 up for our opener, what an innings! 🚀
Match centre: https://t.co/tD6E6ZJYq7
🌴 #WIvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/ahosOKJ4Dw
बेथेलची फिफ्टी, बटलर अपयशी : प्रत्युत्तरात इंग्लंडनं चांगली सुरुवात केली. सॉल्टनं अवघ्या 54 चेंडूत शतक झळकावलं. तसंच जॅक बेथेलनंही अर्धशतक झळकावलं. दोन्ही फलंदाजांनी मिळून वेगवान धावा केल्या आणि इंग्लंडनं 16.5 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. बेथेलनं 36 चेंडूत नाबाद 58 धावा केल्या. विल जॅक 17 धावा करुन बाद झाला. कर्णधार जॉस बटलरला खातंही उघडता आलं नव्हतं.
एकाच संघाविरुद्ध शतकं झळकावण्याचा पराक्रम : सॉल्टचं हे आंतरारष्ट्रीय T20 क्रिकेटमधील तिसरं शतक आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही तिन्ही शतकं केवळ एकाच संघ वेस्ट इंडिजविरुद्ध झाली आहेत. यासह फिल सॉल्ट कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक T20 शतकं झळकावणारा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी एका संघाविरुद्ध 2 शतके झळकावण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल, वेस्ट इंडिजचा एविन लुईस, यूएईचा मुहम्मद वसीम आणि सर्बियाचा लेस्ली डनबर यांच्या नावावर होता. तसंच सॉल्टनं आतरराष्ट्रीय T20 मध्ये तिसरं शतक झळकावून बाबर आझम आणि कॉलिन मुनरो सारख्या दिग्गजांची बरोबरी केली आहे. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
The moment Phil Salt brought up his third T20I century! 💯
— England Cricket (@englandcricket) November 10, 2024
🌴 #WIvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/Exrv3nD0RQ
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारे खेळाडू :
- रोहित शर्मा (भारत) - 5
- ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) - 5*
- सूर्यकुमार यादव (भारत) - 4*
- सबवान देवीझी (झेक प्रजासत्ताक) - 3
- कॉलिन मुनरो (न्यूझीलंड) - 3
- फिल सॉल्ट (इंग्लंड) - 3*
हेही वाचा :