ETV Bharat / state

वादळीवाऱ्यामुळे घरावरील छत उडाले... आता रहायचं कुठं? - रेन इन खेड न्यूज

रविवारी संध्याकाळपासून वादळीवाऱ्यासह पावसाच्या सरी येत आहेत. यामध्ये काल सायंकाळच्या सुमारास खेड तालुक्यातील कोये गावातील बाळासाहेब गायकवाड, राजू गायकवाड, दौलत गायकवाड या शेतकऱ्यांच्या घरावरील छत वादळी वाऱयात उडाले आहेत.

rain news
वादळीवाऱ्यामुळे घरावरील छत उडाले...
author img

By

Published : Jun 1, 2020, 6:51 PM IST

पुणे - कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करत असताना पुण्याच्या ग्रामीण भागात चक्रीवादळासह पावसाचे संकट आहे. या वादळीवाऱ्यासह सुरू झालेल्या पावसात खेड तालुक्यातील कोये गावात अनेक घरांवरील छतच उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

कोरोना संकटाचा सामना करत असताना खेड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. या संकटावर मात करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक लढत आहेत. मात्र, अशात आता या नागरिकांसमोर वादळीवाऱ्यासह पावसाचे मोठे संकट उभे राहिले आहे.

वादळीवाऱ्यामुळे घरावरील छत उडाले...

रविवारी संध्याकाळपासून वादळीवाऱ्यासह पावसाच्या सरी येत आहेत. यामध्ये काल सायंकाळच्या सुमारास खेड तालुक्यातील कोये गावातील बाळासाहेब गायकवाड, राजू गायकवाड, दौलत गायकवाड या शेतकऱ्यांच्या घरावरील छत वादळीवाऱ्यात उडाले आहेत. त्यामध्ये घरगुती साहित्यांसह अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन पावसाच्या तोंडावर वादळीवाऱयामुळे घरावरील छत उडाल्याने सर्व संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे पुढील काळात रहायचे कुठं? असा प्रश्न या नागरिकांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे शासकीय पातळीवरून तातडीने पंचनामा करून तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.