ETV Bharat / state

यावर्षी 33 कोटी वृक्षारोपणाचे लक्ष्य - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार - डीपी प्लान

यावर्षी राज्यामध्ये वनविभागाच्या वतीने तब्बल 33 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य निर्धारित केले असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Jun 4, 2019, 1:34 PM IST

पुणे - दरवर्षी 1 जुलैपासून विविध सरकारी कार्यालयांमार्फत वृक्षारोपण केले जाते. त्यासोबतच वृक्षारोपणाचे लक्ष्यदेखील निर्धारित केले जाते. यावर्षी राज्यामध्ये वनविभागाच्या वतीने तब्बल 33 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य निर्धारित केले असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

पत्रकारपरिषदेला संबोधतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
यासंदर्भात पुणे येथे विभागीय आढावा बैठक घेण्यात आली. त्यात ते म्हणाले, राज्यात यंदा वनविभागाच्या वतीने 33 कोटी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. आतापर्यंत राज्यात 24.14 कोटी वृक्षारोपण करण्यात आले. तर वृक्ष जगण्याचे प्रमाण 86 टक्के आहे. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत 5 कोटी 47 लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य आहे. तसेच मनपाने डीपी प्लान बरोबर टीपी प्लान करण्याचेही आवाहन मुनगंटीवार यांनी केले. या बैठकीला मुनगंटीवार यांच्यासह खासदार गिरीश बापट, मंत्री दिलीप कांबळेंसह अधिकारी उपस्थित होते.चंद्रपूरमध्ये अधिक झाडे लावली त्याची गरज नाही, असे भाजप नेत्या शोभा फडणवीस यांनी म्हटले होते. यावर वन आणि धनाला मर्यादा नसते. ते त्यांचं व्यक्तिगत मत असेल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Intro:mh pun sudhir mungantivar 2019 avb 7201348Body:mh pun sudhir mungantivar 2019 avb 7201348

anchor
राज्यात यंदा वनविभागाच्या वतीनं 33 कोटी वृक्षारोपण करण्यात येणारय. या संदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुणे विभागाचा आढावा घेतलाय. यावेळी त्यांनी लागवड केलेल्या वृक्षाचं जगण्याचं प्रमाण 86 टक्के असल्याचं सांगितलं तर मनपाने डीपी प्लान बरोबर टीपी प्लान करण्याचं आवाहन मुनगंटीवार यांनी केलंय.या बैठकीला मुनगंटीवार यांच्यासह खासदार गिरीश बापट, मंत्री दिलीप कांबळेसह अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुनगंटीवार यांनी आतापर्यंत राज्यात 24.14 कोटी वृक्षारोपण करण्यात आल्याचं सांगितलं. तर वृक्ष जगण्याचं प्रमाण 86 टक्के आहे. तर पुणे विभागात पाच जिल्ह्यांत 5 कोटी 47 लाख वृक्ष लागवड लक्ष आहे. तर मनपा आता डीपी प्लान सह टीपी प्लॅन करावा, असं आवाहन मुनगंटीवार यांनी केलंय. चंद्रपूर मध्ये ज्यास्त झाडे लावली त्याची गरज नाही अशी टीका करणाऱ्या
भाजप नेत्या शोभाताई फडणवीस यांच्या टिकेवर बोलतांना त्यांनी वन आणि धनाला मर्यादा नसते असे सांगत ते त्यांचं व्यक्तिगत मत असल्याचं म्हटलंय.
तर ड्राय डे कमी करण्यावर बोलताना त्यांनी यंदा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वे जयंती वर्ष आहे हि बाब लक्षात घेऊन तर्कशास्त्र आधारावर निर्णय होईल, असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

Byte सुधीर मुनगंटीवार, वनमंत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.