ETV Bharat / state

महाराष्ट्रातील दुसरी लाट पहिल्या कोरोना लाटेपेक्षा भयानक असणार - डॉ.अविनाश भोंडवे

राज्यासह पुणे शहरात गेल्या महिन्याभरापासून मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. पहिल्या लाटेपेक्षा आत्ताची दुसरी लाट ही घातक असून जसे नोव्हेंबरमध्ये ब्रिटनमध्ये नवीन विषाणू तयार होत होता. तसेच महाराष्ट्रात तयार झालेला हा नवीन विषाणू प्रकार असू शकतो, अशी माहितीही भोंडवे यांनी दिली.

पुणे
पुणे
author img

By

Published : Mar 19, 2021, 4:06 PM IST

पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यात कोरोनाची ही दुसरी लाट असून या दुसऱ्या लाटेचा 'पिक पॉईंट' हा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात असू शकतो आणि राज्याचा रुग्णसंख्या वाढीचा आकडा हा 40 हजाराच्या पुढे जाऊ शकतो, असा अंदाज भारतीय वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केला आहे.

पुणे

राज्यासह पुणे शहरात गेल्या महिन्याभरापासून मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. पहिल्या लाटेपेक्षा आत्ताची दुसरी लाट ही घातक असून जसे नोव्हेंबरमध्ये ब्रिटनमध्ये नवीन विषाणू तयार होत होता. तसेच महाराष्ट्रात तयार झालेला हा नवीन विषाणू प्रकार असू शकतो, अशी माहितीही भोंडवे यांनी दिली. फेब्रुवारीच्या पहिल्या तारखेला महाराष्ट्रात रोज सापडणाऱ्या रुग्णांची संख्या होती 2000 आणि 18 मार्चला म्हणजेच बरोबर दीड महिन्यात ही संख्या दिवसाला 28 हजारावर गेली आहे. गेल्या महिन्याभरात राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. याचे कारण पाहिले तर नक्कीच ही दुसरी लाट आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत रुग्णसंख्या कमी होती. रुग्णसंख्या हळूहळू खाली येत होती. पण, ती कधीही शून्यावर आली नाही. याचाच अर्थ असा की पहिली लाट ओसरत होती आणि दुसऱ्या लाटेला नक्कीच सुरुवात होत होती. त्याप्रमाणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या दुसऱ्या लाटेला सुरुवातही झाली.

संक्रमितांना शोधून चाचणी होत असल्याने रुग्णसंख्येत वाढ

एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला की त्याच्या संपर्कात आलेल्या 20 जणांची चाचणी करणे गरजेचे आहे. मधल्या काळात ते पूर्ण केले गेले नाही आधी त्याच्या संपर्कात आलेल्या 2 ते 3 जणांचीच संपर्क चाचणी होत होती, ते प्रमाण आता 8 ते 10 पर्यंत आलेले आहे. या चौपट वाढवलेल्या संपर्क तपासणीमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. आताचा जो प्रसार आहे तो 25 ते 40 वयोगटात जास्त होत आहे आणि यातील 90 टक्के रुग्ण हे लक्षणे विरहीत असून पूर्वीपेक्षा याचा वेग हा दुपट्टीने वाढत आहे, असेही यावेळी डॉ.अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

लसीकरण सर्वांसाठी खुले करावे

पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट खूप घातक असून याचा प्रसार हा खूप वेगाने होत आहे. त्यामुळे सरकारने यावर उपाय करण्यासाठी लस ही सर्वांसाठी खुली करावी आणि जास्तीत-जास्त लसीकरण करण्यात यावे, अशी विनंती देखील भोंडवे यांनी यावेळी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.