ETV Bharat / state

मावळमधील भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड, राष्ट्रवादीचे सुनिल शेळके विजयी - मावळ सुनिल शेळके

मावळ विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. मात्र, या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल शेळके यांनी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचा पराभव केला. त्यामुळे, मावळमधील भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पडले आहे.

Sunil Shelke Maval constituency
author img

By

Published : Oct 25, 2019, 5:56 AM IST

पुणे - मावळ विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. मात्र, या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल शेळके यांनी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचा पराभव केला. त्यामुळे, मावळमधील भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पडले आहे.

मावळमधील भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड, राष्ट्रवादीचे सुनिल शेळके विजयी

गेल्या काही वर्षांपासून सुनिल शेळके यांनी मावळमध्ये स्वखर्चाने विकासकामे केली होती. तरीही, भाजपतर्फे त्यांना उमेदवारी न मिळता, भेगडेंना भाजपकडून उमेदवारी मिळाली. त्यानंतर बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेळके यांचा मानस होता. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली आणि इथला सामना रंगतदार बनला. विजयी उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Intro:mh_pun_05_maval_ncp_win_avb_mhc10002Body:mh_pun_05_maval_ncp_win_avb_mhc10002

Anchor:-मावळमध्ये राष्ट्रवादीचे सुनील शेळके हे विजयी झाले आहेत. मावळमध्ये गेल्या २५ वर्षपासून भारतीय जनता पक्ष्याची सत्ता होती. मात्र, या विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनील शेळके यांनी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचा पराभव करत मावळमधील भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळत आहे. विजयी उमेदवाराच्या जयघोषाने अवघा मावळ परिसरात दुमदुमून निघत आहे.

गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार सुनील शेळके यांनी मावळ मधील गावागावात पोहचून स्वखर्चातून विकास कामे केली होती. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळणार अस ग्रामीण भागातून गृहीत धरलं जात होतं. मात्र, तस न होता राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली. बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेळके यांचा मानस होता. परंतु, येन वेळी राष्ट्रवादीकडून मावळ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीला रंगतदार बनवले, सुनील शेळके यांना उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादीकडून अनेक जण नाराज झाले त्यांनी पक्ष बदलत भाजपात प्रवेश केला. मात्र याचा तिळमात्र फटका राष्ट्रवादी पक्ष किंवा सुनील शेळके यांना बसलेला दिसत नाही. राष्ट्रवादीकडून तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तर भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंडे फडणवीस यांच्या जाहीर सभा झाल्या. शरद पवार यांच्या जाहीर सभेचा फायदा सुनील शेळके यांना झाला. मावळमधील गेल्या २५ वर्षाची भाजपाची सत्ता राष्ट्रवादीने मोडीत काढली आहे.

बाईट:- सुनील शेळके- राष्ट्रवादी आमदार Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.