ETV Bharat / state

पर्वती विधानसभा मतदारसंघ; भाजपच्या माधुरी मिसाळ हॅट्ट्रिक ठोकणार का? - आमदार माधुरी मिसाळ

पर्वती विधानसभा क्षेत्रातील मतदार गेल्या दोन निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाच्या आमदार माधुरी मिसाळ यांना निवडून देत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता नसताना देखील माधुरी मिसाळ या 2009 मध्ये पर्वती विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदा निवडून आल्या. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा माधुरी मिसाळ यांना पर्वती मतदारसंघातून निवडून देत आमदार केले.

पर्वती विधानसभा मतदारसंघ
author img

By

Published : Sep 19, 2019, 3:21 PM IST

पुणे - पुण्यातील पर्वती मतदारसंघात एकीकडे गंगाधाम सारख्या उच्चभ्रू सोसायट्या तर दुसरीकडे जनता वसाहत, आंबेडकर वसाहत सारख्या मोठ्या झोपडपट्ट्या देखील आहेत. त्याच बरोबर या मतदारसंघात मध्यम वर्गीय कुटुंबेदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. या मतदारसंघाची सर्वात मोठी समस्या आहे, ती म्हणजे दिवसेंदिवस वाढती वाहतूक कोंडी आणि वाढलेल्या झोपडपट्टया यांची.

या समस्यांपासून सुटका मिळेल या आशेने पर्वती विधानसभा क्षेत्रातील मतदार गेल्या दोन निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाच्या आमदार माधुरी मिसाळ यांना निवडून देत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता नसताना देखील माधुरी मिसाळ या 2009 मध्ये पर्वती विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदा निवडून आल्या. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा माधुरी मिसाळ यांना पर्वती मतदारसंघातून निवडून देत आमदार केले. मात्र, अजूनही अनेक प्रश्न या मतदारसंघात प्रलंबित आहेत.

हेही वाचा - 'या' ७५ मतदारसंघावर आहे शिवसेनेची मदार; ८० टक्के जागा जिंकण्याचे लक्ष्य

मतदारसंघात येणाऱ्या स्वारगेट-कात्रज रस्त्यावरील बी आर टी प्रकल्प पूर्णपणे अपयशी ठरला आहे. सिंहगड रस्त्यावर 10 कोटींचा एक फ्लाय ओवर ब्रिज मंजूर केल्याचा दावा केला. मात्र, सिंहगड रस्त्यावर मेट्रोच असल्याने ब्रिजचा अजून ठाव-ठिकाणा नाही. सिंहगड रस्त्याला नदी पात्रातून जाणाऱ्या पर्यायी रोडच्या कामाला अजूनही सुरुवात झाली नाही, कचरा प्रश्न पूर्णपणे सुटला नाही, महिला आमदार असून मतदारसंघात महिलांसाठी सार्वजनिक शौचालयाची कमतरता जाणवते.

हेही वाचा - 'वंचित' पासून दूर होणं 'एमआयएम'च्या पथ्थ्यावर पडणार?

इंदिरा नगर, आंबेडकर नगर, आनंद नगर मार्केट यार्ड, जनता वसाहत, प्रेमनगर, पान माळा, तळजाई, चव्हाण नगर, मीनाताई ठाकरे वसाहत, जय भवानी नगर, संजयगांधी झोपडपट्टी अशा ठिकाणी एस आर ए योजना राबविण्यास अपयश आले आहे. झोपडपट्ट्यांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी विद्यमान आमदार माधुरी मिसाळ पुन्हा इच्छुक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस माधुरी मिसाळ यांच्या विरोधात विद्यमान नगरसेविका अश्विनी कदम यांना मैदानात उतरवू शकतात. या मतदारसंघात मिसाळ यांचे असलेले प्राबल्य पाहता भाजपकडून मिसाळ यांच्यासह केवळ 4 जण इच्छुक आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे या मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी आहे. पर्वती मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि मनसेला मानणारा मोठा वर्ग असल्याने त्यांच्या उमेदवारांवर ही नजर असणार आहे.

Intro:पर्वती विधानसभा आढावाBody:mh_pun_03_parvati_vidhansbha_adhava_pkg_7201348

Anchor
पुण्यातील पर्वती मतदारसंघात एकीकडे गंगाधाम सारख्या उच्चभ्रू सोसायट्या तर दुसरीकडे जनता वसाहत, आंबेडकर वसाहत सारख्या मोठ्या झोपडपट्ट्या देखिल आहेत. त्याच बरोबर या मतदारसंघात मध्यम वर्गीय कुटुंब देखिल मोठ्या प्रमाणात आहेत. या मतदारसंघाची सर्वात मोठी समस्या आहे, ती म्हणजे दिवसेंदिवस वाढती वाहतूक कोंडी आणि वाढलेल्या झोपडपट्टया
या समस्या पासून सुटका मिळेल या आशेने पर्वती विधानसभा क्षेत्रातील मतदार गेल्या 10 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या आमदार माधुरी मिसाळ यांना निवडून देत आहेत. केंद्रांत आणि राज्यात भाजपची सत्ता नसताना देखिल माधुरी मिसाळ या 2009 मध्ये पर्वती विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदा निवडून आल्या. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा माधुरी मिसाळ यांना पर्वती मतदारसंघातून निवडून देत आमदार केलं. मात्र अजून ही अनेक प्रश्न या मतदारसंघात प्रलंबित आहेत...
मतदारसंघात येणारा स्वारगेट - कात्रज रोडवरील बी आर टी प्रकल्प पुर्णपणे अपयशी ठरला आहे. सिंहगड रोडवर 10 कोटीं रुपयचा एक फ्लाय ओवर ब्रिज मंजूर केल्याचा दावा. मात्र सिंहगड रोडवर मेट्रोच असल्याने ब्रिज चा अजून ठाव ठिकाणा नाही. सिंहगड रोडला नदी पात्रातून जाणार पर्यायी रोडच्या कामाला अजूनही सुरुवात झाली नाही, कचरा प्रश्न पुर्णपणे सुटला नाही, महिला आमदार असून मतदारसंघात महिलांसाठी सार्वजनिक शौचालयाची कमतरता
इंदिरा नगर, आंबेडकर नगर, आनंद नगर मार्केट यार्ड, जनता वसाहत, प्रेम नगर, पान माळा, तळजाई, चव्हाण नगर, मीनाताई ठाकरे वसाहत, जय भवानी नगर, संजयगांधी झोपडपट्टी अशा ठिकाणी एस आर ए योजना राबविण्यास आलं अपयश आले आहे झोपडपट्ट्याचे प्रश्न दिवसेंदिवस बनत आहेत गंभीर.….यंदाच्या निवडणुकीसाठी विद्यमान आमदार माधुरी मिसाळ पुन्हा इच्छुक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस माधुरी मिसाळ यांच्या विरोधात विद्यमान नगरसेविका अश्विनी कदम यांना मैदानात उरवू शकतात या मतदार संघात मिसाळ यांचे असलेले प्राबल्य पाहता भाजप कडून मिसाळ यांच्या सह केवळ 4 जण इच्छुक आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस कडे या मतदारसंघात इच्छुकाची मोठी गर्दी आहे. पर्वती मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि मनसे ला मानणारा मोठा वर्ग असल्याने त्याच्या उमेदवारांवर ही नजर असणार आहे....Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.