ETV Bharat / state

प्लास्टिक पासून इंधन निर्मिती; महापालिका व रुद्रा एन्व्हायरमेंटल सोल्युशन लिमिटेडचा उपक्रम - Pune Garbage Project

प्लास्टिक रिसायकल जरी केले तरी ते नष्ट होत नसल्याने कचऱ्याची समस्या कायम आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी पुणे महापालिकेकडून प्लास्टिकपासून इंधन तयार करण्याचे प्रकल्प टाकले जात आहे.

pune
प्लास्टिक पासून निर्माण होतोय इंधन
author img

By

Published : Dec 10, 2019, 2:16 PM IST

पुणे- प्लास्टिक हा पर्यावरणाला घातक ठरत असलेला घटक आहे. महानगरांमध्ये दररोज टनाने प्लास्टिक गोळा होतो. मात्र त्याचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत प्लास्टिक रिसायकल करण्याचे अनेक प्रयोग जगभर सुरू आहेत. मात्र, प्लास्टिक रिसायकल जरी केले तरी ते नष्ट होत नसल्याने कचऱ्याची समस्या कायम आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी पुणे महापालिकेकडून प्लास्टिकपासून इंधन तयार करण्याचे प्रकल्प टाकले जात आहे.

प्लास्टिक पासून निर्माण होतोय इंधन

महापालिकेकडून टाकल्या जाणाऱ्या प्रकल्पातून निर्माण होणारे इंधन व्यावसायिक वापरासाठी पुरवले जात आहे. तर, इंधन तयार झाल्यानंतर उरलेला टार हा रस्ते बांधणीसाठी उपयोगी ठरत आहे. या प्लस्टिक इंधन प्रकल्पासाठी महापालिका काही संस्थांसोबत काम करत आहे. त्यातली रुद्रा एन्व्हायरमेंटल सोल्युशन लिमिटेड ही एक संस्था आहे. या संस्थेचा जेजुरीला ३०० किलोचा प्लांट आहे. त्याचबरोबर, या संस्थेचे महापालिकेसोबत पुण्यातील नारायणपेठ भागात १२५ किलोचा एक प्लांट सुरू करण्यात आला आहे.

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या भागात सदर कचार व्यवस्थापन प्लांट लावल्यास त्या भागातील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावने शक्य आहे. आणि त्या दृष्टीने पावलेही टाकली जात आहे. त्याचबरोबर, या माध्यमातून तयार होणाऱ्या इंधनाचा वापर हा केरोसीन स्टोव्ह, बॉयलरचे इंधन म्हणून करता येणार आहे. ६ लिटर इंधन तयार करण्यासाठी १० किलो प्लास्टिक वापरल्या जाते. त्याचबरोबर, या प्रकल्पासाठी फार मोठ्या जागेची आवश्यकता नसते. त्यामुळे शहराच्या विविध भागात असे प्लांट उभारले जाऊ शकतात. शिवाय, इंधन बनवल्यानंतर उरलेल्या अवशेषांचा वापर हा रस्ते बांधणीत केला जातो. त्यामुळे प्लास्टिक कचरा हा शंभर टक्के वापरला जात आहे. एकंदरीतच प्लास्टिकच्या समस्येवर असे प्लांट हा एक चांगला उपाय ठरू शकणार आहे.

हेही वाचा- सराईत चोरट्यांची टोळी गजाआड; चाकण औद्योगिक वसाहतीत लुटला होता टीव्हीने भरलेला कंटेनर

Intro:प्लास्टिक पासून इंधन...महानगरातील प्लास्टिक कचरा समस्येवर उपायBody:mh_pun_01_plastic_degridation_plant_special_story_pkg_7201348

प्लास्टिक, पर्यावरणाला सध्या सर्वात घातक ठरत असलेला घटक...एकीकडे प्लास्टिकचा होणारा भरमसाठ वापर तर दुसरीकडे महानगरांमध्ये दररोज टनाने गोळा होणार प्लस्टिकच विघटन होत नसल्याने पर्यावरणावर अनेक घातक परिणाम करून होतायत अशा परिस्थितीत प्लास्टिक रिसायकल करण्याचे अनेक प्रयोग जग भर सुरू आहेत, प्लास्टिक रिसायकल केले तरी नष्ट मात्र होत नाही त्यामुळे प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या कायम आहे मात्र प्लास्टिक पासून द्रव आणि वायू इंधन तयार करणे शक्य झाल्याने प्लास्टिकच्या कचऱ्यावर मोठा उपाय मिळाला आहे, पुणे महापालिकेकडून सध्या प्लास्टिक पासून इंधन तयार करण्याचे प्रकल्प टाकले जातायत काही प्रकल्प कार्यान्वित देखील झाले आहेत...या प्रकल्पातून निर्माण होणारे इंधन व्यावसायिक वापरासाठी पुरवले जाते तर इंधन तयार झाल्यानंतर उरलेला टार हा रस्ते बांधणी साठी उपयोगी ठरतो आहे...या प्लस्टिक इंधन प्लांट साठी महापालिका काही संस्थांच्या सोबत काम करते आहे त्यातली रुद्रा इनवायरमेन्टल सोल्युशन लि ही एक संस्था आहे, संस्थेचा जेजुरीला 300 किलोचा प्लांट आहे तर महापालिकेच्या सोबत पुण्यातील नारायणपेठ भागात 125 किलोचा एक प्लांट सुरू करण्यात आलाय, महापालिकेच्या त्या त्या क्षेत्रीय कार्यालयामधील प्लास्टिक कचरा त्या त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्लांट उभारून करता येणे शक्य आहे त्या दृष्टीने पावलं टाकली जातायत...या माध्यमातून तयार होणाऱ्या इंधनाचा वापर हा केरोसीन स्टोव्ह, जनसेट, बॉयलर मध्ये इंधन म्हणून करता येतोय, 6 लिटर इंधन तयार करण्यासाठी 10 किलो प्लास्टिक वापरल्या जाते...... या प्लांट साठी फार मोठ्या जागेची आवश्यकता नसते त्यामुळे शहराच्या विविध भागात असे प्लांट उभारले जाऊ शकतात शिवाय इंधन बनवल्यानंतर उरलेल्या रेसिड्यू चा वापर हा रस्ते बांधणीत केला जातोय त्यामुळे प्लास्टिक कचरा हा शंभर टक्के वापरला जातोय...एकंदरीतच प्लास्टिकच्या समस्येवर असे प्लांट हा एक चांगला उपाय ठरू शकतो आहे..
Byte मेधा ताडपत्रिकार, संचालिका, रुद्रा एनवायरमेट सोल्युशन
Byte पोरस भागवत, व्यवस्थापक,रुद्रा एनवायरमेट सोल्युशनConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.